शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

नटावदच्या ‘त्या’ बाधिताचा रिपोर्ट येण्याआधीच डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 12:30 IST

नंदुरबार : तालुक्यातील नटावद येथील कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल येण्यापूर्वीच त्याला डिस्चार्ज दिल्याचा प्रकार समोर आला आहे़ रविवारी अहवाल मिळाल्यानंतर ...

नंदुरबार : तालुक्यातील नटावद येथील कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल येण्यापूर्वीच त्याला डिस्चार्ज दिल्याचा प्रकार समोर आला आहे़ रविवारी अहवाल मिळाल्यानंतर त्याला आरोग्य पथकाने शोधाशोध करुन रात्री उशिरा आयसोलेशनमध्ये दाखल केले आहे़नंदुरबार शहरातील कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने ३१ वर्षीय युवकास २६ एप्रिलपर्यंत सिव्हीलच्या आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले होते़ येथून त्याची रवानगी होळ तर्फे हवेली येथील क्वारंटाईन कक्षात करण्यात आली होती़ त्याच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे़ दरम्यान रविवारी ३ मे रोजी सकाळी त्याला सोडून देण्यात आल्याची माहिती आहे़ येथून तो नंदुरबार शहरातील आपल्या घरी गेला होता़ तर तेथून नटावद ता़ नंदुरबार येथे पत्नीला भेटण्यासाठी गेला़ सायंकाळी त्याचा अहवाल मिळाल्यानंतर आरोग्य विभाग व महसूल विभागाची एकच धावपळ उडाली होती़ त्याला रात्री नटावद येथून पथकाने ताब्यात घेत सिव्हीलमध्ये आणले होते़

लक्षणेच दिसत नसल्याचा दावा

 नंदुरबार शहरातील प्रथम कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या ३१ वर्षीय युवकात तब्बल २४ दिवस होऊनही कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नसल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे़त्याच्या संपर्कात आलेली पत्नी, मुलगी आणि आई यांचे स्वॅब नमुने आरोग्य विभागाने घेतले आहेत़ तर संपर्कात आलेल्या आठ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे़ त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु आहे़नटावद येथील संबधिताच्या घरासह परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे़ त्यानुसार कारवाई सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे़ दरम्यान अद्यापही त्याच्या लक्षणे दिसत नसल्याचे सांगण्यात आले आहे़