नंदुरबार काँग्रेस कमेटीतर्फे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 12:37 IST2021-01-23T12:36:02+5:302021-01-23T12:37:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रिपब्लिक भारत टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत जिल्हा ...

Dharne agitation by Nandurbar Congress Committee | नंदुरबार काँग्रेस कमेटीतर्फे धरणे आंदोलन

नंदुरबार काँग्रेस कमेटीतर्फे धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रिपब्लिक भारत टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले. 
यावेळी काँग्रेसने जिल्हाधिकारी यांना निवेदन देत अर्णब गोस्वामीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. निवेदनात, अर्णब गोस्वामी व बार्कचे अधिकारी दासगुप्ता यांच्यासोबत व्हाॅट्स अप चॅट करत अनेक देशविरोधी बाबींवर चर्चा केल्याचे उघड झाले आहे. पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालकोटवर भारताने हल्ला केला या कारवाईची माहिती गोस्वामी यांना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून दिसत आहे. देशाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील व गोपनीय माहिती गोस्वामी यांच्याकडे कशी आली, देशाच्या संरक्षणविषयक माहिती बाहेर येणे अत्यंत गंभीर आहे. गोस्वामी व त्याच्या रिपब्लिक टीव्हीने दूरदर्शनची सॅटेलाईट फ्रीक्वेन्सी बेेकायदेशीरपणे वापरुन प्रसार भारतीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान केल्याचे म्हटले आहे. 
यावेळी माजीमंत्री पद्माकर वळवी, कार्याध्यक्ष दिलीप नाईक, पंडीतराव पवार, शांतीलाल पाटील, नरेश पवार, खंडेराव पवार, देवा चाैधरी, राजेंद्र पाटील, स्वरूप बोरसे, एजाज बागवान, छोटू भिल, शिवदास भिल, भिमराव पाटील आदी उपस्थित होते. 

Web Title: Dharne agitation by Nandurbar Congress Committee