Dhangar Samaj's agitation warning | धनगर समाजाचा आंदोलनाचा इशारा

धनगर समाजाचा आंदोलनाचा इशारालोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धनगर समाजालाही अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा फायदा मिळावा व त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी मल्हारसेना, अहिल्या वाहिनी व कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील धनगर समाज देशाच्या राज्य घटनेतच अनुसूचीत जमातीमध्ये समाविष्ट आहे. परंतु केवळ शब्द अपभ्रंशामुळे धनगड अािण धनगर असा ड आणि र यामुळे अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून गेली ७० वर्ष समाज वंचीत आहे. राज्यात धनगड जमात अस्तित्वात नाही असे शपथपत्र सादर केलेले आहे. त्यामुळे राज्यात धनगर समाजतच अनुसूचित जमातीत समाविष्ट असल्याचे सिद्ध झालेले आहे. समाजाला अनुसूचित जमातीत समावेश केल्यासंबधी तातडीने अध्यादेश काढण्यात यावा. अनुसूचित जमातीचा दाखला देण्यात यावा. सवलतींची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. निवेदन देतांना समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंदा कुवर, मल्हारसेनेचे जिल्हाध्यक्ष कन्हैया धनगर यांच्यासह कैलास न्हाळदे, राजेंद्र धनगर, प्रा.बबन बागुल, रामू धनगर, दत्तू सूळ, शिवाजी एडगे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

Web Title: Dhangar Samaj's agitation warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.