धडगावला जनता कर्फ्यूला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:26 IST2021-04-05T04:26:53+5:302021-04-05T04:26:53+5:30

आतापर्यंत धडगाव तालुका हा कोरोनापासून काही पावले दूर असल्याचे दिसत होते. त्याला तालुक्यातील नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करून आपल्यापासून ...

Dhadgaon responds to public curfew | धडगावला जनता कर्फ्यूला प्रतिसाद

धडगावला जनता कर्फ्यूला प्रतिसाद

आतापर्यंत धडगाव तालुका हा कोरोनापासून काही पावले दूर असल्याचे दिसत होते. त्याला तालुक्यातील नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करून आपल्यापासून दूर ठेवण्यास यशही मिळविलं होते. मात्र, गेल्या काही दिवसांत कोरोनाने धडगाव तालुक्यातील ग्रामीण भागातही पाय पसरवायला सुरुवात केली असून, ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनीही नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. कारण धडगाव तालुक्यातील आरोग्य यंत्रणा पाहता एकदा की या व्हायरसने ग्रामीण भागात पाय रोवले तर धडगावसारख्या अतिदुर्गम तालुक्याची परिस्थिती गंभीर होण्यास वेळ लागणार नाही व कोरोना धडगाव तालुक्यासाठी धोकादायक ठरू शकतो. याची खबरदारी घेत तालुक्यातील नागरिकांनी वेळीच सावध पवित्रा घेणे गरजेचे असून, योग्य ती काळजी घेण्याची सध्या घरज आहे. तालुक्यातील प्रशासनालादेखील ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून मदत करण्याची गरज आहे.

Web Title: Dhadgaon responds to public curfew