शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेविकांची प्रतिनियुक्ती रद्द करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य सेविकांना मालेगाव येथे देण्यात आलेली प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी परिचारिकांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य सेविकांना मालेगाव येथे देण्यात आलेली प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी परिचारिकांनी केली आहे़ महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या जिल्हा शाखेने हे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे़परिचारिकांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या या निवेदनात, जिल्ह्यातील आरोग्य सेविकांना मालेगाव महानगरपालिका येथे प्रतिनियुक्ती देण्यात आलेली आहे़ मार्च २०२० पासून देशात व महाराष्ट्राचा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे़ राज्यात दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे़ अशावेळी शासनस्तरावर काम करणाऱ्या आरोग्य सेविका ह्या सर्व्हे करणे, रुग्णांना दाखल करणे, क्वारंटाईन करणे आदी कामे करत आहेत़ दरम्यान जिल्ह्यात ठिकठिकाणी असलेल्या क्वारंटाईन कक्षात परराज्यातून येणाºया स्थलांतरीत मजूरांच्या तपासण्या करत आहेत़ कंटेन्मेंट झोनसह विविध ठिकाणी आरोग्य सेविका काम करत आहेत़ केलेल्या सर्वेक्षणांचे अहवाल नियमित जिल्हा परिषदेत देत आहेत़ मालेगाव हे शहर रेड झोनमध्ये आहे़ याठिकाणी सेवा देत असताना आरोग्यसेविकांना कोरोनाची बाधा होण्याची व तेथून परतल्यानंतर कुटूंबिय किंंवा इतर सहकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे़ प्रतिनियुक्ती दिलेल्या सर्वांच्या घरी वृद्ध आई-वडील, सासू-सासरे, लहान मुले असल्याने सहानूभूती म्हणून हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे़यावेळी सुरेखा वळवी, सिंधू गवळी, सुनिता वळवी, जे़ए़ संदानशिव, आशा घुगे, मिनाक्षी वळवी, मनीषा पाटोळे, कस्तुरा पाडवी आदी आरोग्य सेविका उपस्थित होत्या़आरोग्यसेविकांनी पालकमंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांनाही हे निवेदन पाठवले असून आमदार डॉ़ विजयकुमार गावीत यांची भेट घेत त्यांना माहिती दिली आहे़ सर्वच आरोग्यसेविका कोरोना व्यतिरिक्त सर्वे निर्देशांक निहाय काम, नियमित प्रसूती, संदर्भ सेवा, माता व बालसंगोपनाची कामेही करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले़