लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ग्रामपंचायतींना दिव्यांग कल्याण योेजनेसाठी पाच टक्के निधी खर्च करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सर्व बीडीओंना आणि त्यांच्याकडून सर्व ग्रामपंचायतींना देवूनही अनेक ग्रामपंचायतींनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. दरवर्षी दिव्यांग कल्याण योजनेचा पाच टक्के निधी दुसºयाच योजनेसाठी वापरला जात असल्याचा आरोप होत आहे.शासनाने दिव्यांगांच्या कल्याणासाठी विविध स्तरावर निधीची तरतूद केली आहे. जिल्हा परिषद स्तरावर, पंचायत समिती स्तर आणि ग्रामपंचायत स्तरावर हा निधी राखीव असतो. ग्रामपंचायतींनी त्यांना मिळालेल्या एकुण निधीतून दिव्यांग कल्याणाच्या योजना राबविण्यासाठी किमान पाच टक्के निधी खर्च करणे आवश्यक असते. त्याअंतर्गत दिव्यांगांसाठी शिबिर घेणे, साहित्य उपलब्ध करून देणे यासह इतर बाबींचा समावेश असतो. परंतु जिल्ह्यातील ८० टक्के पेक्षा अधीक ग्रामपंचायती हा निधी वापरतच नसल्याचे दिसून येते. या निधीचा वापर दुसºयाच योजनेसाठी केला जात असतो.याबाबत सामाजिक कार्यकर्ते दिग्विजयसिंग राजपूत यांनी आपले सरकार तक्रार निवारण प्रणालीवर तक्रार करूनही आणि माहिती मागणी करूनही ती उपलब्ध केली जात नसल्याचे त्यांचे म्हणने आहे. याचा अर्थ कुठल्याच बीडीओंनी ही बाब गांभिर्याने घेतली नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे राजपूत यांचे म्हणने आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यासाठी संबधितांना सुचना कराव्या अशी मागणीही दिग्विजयसिंग राजपूत यांनी केली आहे.अनेक ग्रामपंचायतींना अशा प्रकारचा निधी असतो हीच माहिती नसल्याचे देखील उघड झाले आहे. त्यामुळे आता बीडीओंनी पाठपुरावा करून प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे.
दिव्यांगांच्या पाच टक्के निधीबाबत उदासिनता कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 12:03 IST
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ग्रामपंचायतींना दिव्यांग कल्याण योेजनेसाठी पाच टक्के निधी खर्च करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सर्व ...
दिव्यांगांच्या पाच टक्के निधीबाबत उदासिनता कायम
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}