नर्मदेत उतरण्याची परवानगीच नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 01:02 PM2020-01-16T13:02:15+5:302020-01-16T13:03:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संक्रांतीच्या दिवशी पवित्र स्रान करण्यासाठी धडगाव तालुक्यातील भूषा हे ठिकाणी सोयीस्कर असल्याने तेथे भाविकांचा ...

Denied permission to land in Narmada | नर्मदेत उतरण्याची परवानगीच नाकारली

नर्मदेत उतरण्याची परवानगीच नाकारली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : संक्रांतीच्या दिवशी पवित्र स्रान करण्यासाठी धडगाव तालुक्यातील भूषा हे ठिकाणी सोयीस्कर असल्याने तेथे भाविकांचा ओघ वाढला. भाविकांची वाढती संख्या व मागील वर्षी झालेल्या बोट दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी यंदाच्या संक्रांतीला धडगाव तालुका प्रशासन तत्पर राहिले असून नर्मदा भाविकांना नदीत उतरण्याची परानगीच दिली गेली नाही. त्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडली नाही.
धार्मिकदृट्या महत्वाच्या ठरणाऱ्या प्रमुख नद्यांपैकी नर्मदा ही एक नदी आहे. धार्मिक महत्व दिले गेल्यामुळे या नदीची परिक्रमा देखील केली जात आहे. अशा महत्वामुळेच संक्रांतीच्या दिवशी या नदीवर ठिकठिकाणी पवित्र स्नान देखील करण्यात आली. त्यानुसार धडगाव तालुक्यातील भूषा या ठिकाणी देखील यंदाच्या संक्रांतीला स्रान करण्यासाठी ठिकठिकाणाहून भाविक दाखल झाले होते.
मागील वर्षी संक्रांतीलाच धडगाव तालुक्यातील तेलखेडी व खरवड येथील भाविक भूषा येथे पवित्र स्नानसाठीच होते, ते बोटमधून फेरफटका मारत असताना अचानक बोट उलटली. या दुर्घटनेत पाच भाविकांचा जागिच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान दोन भाविकांचाही बळी गेला होता. या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी धडगाव ताललुका प्रशासनामार्फत संक्रांतपूर्व उपयायोजना करण्यात आल्या आहे.
धडगाव तालुका प्रशसानापाठोपाठ पोलीस प्रशासनाने देखील तत्परता दाखवत भाविकांसाठी भूषा येथे अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या. त्यात आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला. भाविकांच्या सुरक्षेसाठी बॅरिकेट्स लावण्यात आले. यासह पोलीस प्रशासनांकडून माहिती कक्ष, रस्ते व पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली. यंदा नर्मदा नदीच्या किनाºयावर ठिकठिकाणी १३ हजारापेक्षा अधिक भाविक दाखल झाले होते. परंतु सुरक्षेसाठी संपूर्ण उपाययोजना करण्यात आल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार दिसून आला नाही. नर्मदा नदीत उतरुन स्रान करण्याची कुठलीही परवानगी दिली गेली नाही, शिवाय विनापरवाना बोटीही थांबविण्यात आल्यामुळे मागील दुर्घटनेची पुनरावृत्तीही टळली.

संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी पोलीस प्रशासनामार्फत नर्मदा काठाची पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार सुरक्षेच्या उपाययोजना देखील करण्यात आल्या. बॅरिकेट्स लावत महिला व पुरुषांना आंघोळीसाठी स्वतंत्र व्यवस्था देखील करण्यात आली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलीक, धडगावचे पोलीस निरीक्षक डी.एस.गवळी, गोपनिय शाखेचे अजय कोळी यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी रात्री उशिरापर्यंत भूषा येथेच थांबले होते.
भाविकांचा ओघ वाढण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाने पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांही उपस्थित राहण्याचे सांगितले होते. त्यानुसार पोलीस पाटलांनीही भाविकांच्या सुरक्षेसाठी योगदान दिले.
पोलीस प्रशासनासोबतच महसुल विभागाचे अधिकारी व कर्मचारीही भूषा येथे रात्री उशिरापर्यंत थांबले होते. त्यात धडगावचे तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे व गटविकास अधिकारी चंद्रकांत बोढरे हे संक्रांतीला सकाळपासून उशिरापर्यंत थांबले होते.
पवित्र स्रानसाठी येणाºया भाविकांना कुठलीही समस्या निर्माण होऊ नये, यासाठी खर्डी, भूषा व बिलगाव येथील ग्रामस्थांनी देखील योगदान दिले. या नागरिकांमार्फत संक्रांतीच्या पूर्वसंध्येला नर्मदा काठावर संपूर्ण साफसफाई करण्यात आली.

मागली वर्षी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा आरोग्य विषयक सुविधा अधिक बळकट करण्यात आल्या होत्या. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश बढे हे स्वत: भूषा येथे संकांतीच्या पूर्वसंध्येलाच दाखल झाले होते. त्यांच्यासोबत बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भरगवान खेडकर, डॉ. राकेश पावरा, डॉ.दिनेश वळवी, डॉ. विजय करंकर, डॉ.बडगुजर हे देखील उपस्थित होते. तर धडगाव, अक्कलकुवा व तळोदा येथील फिरते आरोग्य पथक देखील पाचारण करण्यात आले होते.

भूषा येथे दरवर्षी संक्रांतीला येणाºया भाविकांची संख्या अधिक असते. या भाविकांना आवश्यक असणारे साहित्य उपलिब्ध करुन देण्यासाठी तेथे व्यापारी देखील दाखल होऊ लागले. त्यामुळे संक्रांतीच्या दोन्ही दिवशी या गावाला यात्रेचे स्वरुप येते.

संक्रांतीनिमित्त पवित्र स्रान करण्याची परंपरा रुढ झाल्यामुळे धार्मिकदृष्ट्या महत्व प्राप्त झालेल्या नर्मदा नदीवर भूषापाठोपाठ अक्कलकुवा तालुक्यातील मांडवा, माणीबेली व धडगाव तालुक्यातील माकडकुंड या गावांमध्येही भाविकांची गर्दी झाली होती.

Web Title: Denied permission to land in Narmada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.