रांझणीत आढळला डेंग्यूचा रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:14 IST2020-03-16T12:13:54+5:302020-03-16T12:14:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी येथील ११ वर्षीय बालकाला डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्याच्यावर ...

A dengue patient found in the dye | रांझणीत आढळला डेंग्यूचा रुग्ण

रांझणीत आढळला डेंग्यूचा रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी येथील ११ वर्षीय बालकाला डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्याच्यावर धुळे येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तालुका आरोग्य विभागाकडून रांझणी गावात जलद ताप सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याबरोबरच डेंग्युविषयी जनजागृतीही करण्यात येत आहे. आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, प्रतापपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक एन.डी. वळवी, आरोग्य कर्मचारी आर.व्ही. माळकर, एस.बी. निकम, ऋषा गावीत, ज्योती जाधव, आशा कार्यकर्ती मंगला मराठे यांनी परिसरात सर्वेक्षण करून रक्त नमुने घेतले.

बालकाला डेंग्युची लागण झाल्याने डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीकडून गावात धुरळणीची व्यवस्था करण्यात आली असून, तीव्र ताप, अंगदुखी, डोकेदुखी, विशेषत: डोळ्यांच्या खोबणीत दुखणे, अंगावर पुरळसारखी लक्षणे असल्यास गावातील आरोग्य कर्मचारी किंवा प्रतापपूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तपासून उपचार करून घ्यावे, त्याचप्रमाणे लोकांनी स्वच्छता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: A dengue patient found in the dye