भुलाणे येथे बीबीएफ यंत्राद्वारे पेरणीचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:19 IST2021-06-30T04:19:57+5:302021-06-30T04:19:57+5:30

यावेळी बीबीएफ यंत्राद्वारे पेरणीचे फायदे, बियाण्याची बचत, खताची बचत, वेळेची बचत व इतर फायद्यांबाबत कृषी पर्यवेक्षक सुरेश बागुल यांनी ...

Demonstration of sowing by BBF machine at Bhulane | भुलाणे येथे बीबीएफ यंत्राद्वारे पेरणीचे प्रात्यक्षिक

भुलाणे येथे बीबीएफ यंत्राद्वारे पेरणीचे प्रात्यक्षिक

यावेळी बीबीएफ यंत्राद्वारे पेरणीचे फायदे, बियाण्याची बचत, खताची बचत, वेळेची बचत व इतर फायद्यांबाबत कृषी पर्यवेक्षक सुरेश बागुल यांनी माहिती दिली. पेरणीपूर्वी बियाण्यास बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक कृषी सेवक अर्जुन पावरा यांनी करून दाखविले व महत्त्व पटवून दिले. शेतकऱ्यांनी सोयाबीनसह मका, ज्वारी, तूर, मूग, उडीद या पिकांच्या बियाण्याची बीबीएफ यंत्रानेच पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे यांनी केले. शेतकरी संजय ठाकरे यांच्या शेतावर बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने पेरणी करण्यात आली. टुकी येथील नरोत्तम पाटील यांच्याकडील बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने पेरणी करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांसह कृषी सेवक चौधरी, वसावे, राहुल खेडकर, कल्याण पवार, अंजली चव्हाण, भाग्यश्री पावरा, दीपाली खर्डे आदी उपस्थित होते.

Web Title: Demonstration of sowing by BBF machine at Bhulane