शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी ग्राहकांना लेखी सूचना देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:29 IST

शहादा विभागातील वीजबिल वाटप हे संबंधित व्यवस्थेकडून हेतूपुरस्सर विलंबाने केले जात आहे. त्याबाबत माहिती घेतली असता शहादा शहरात एका ...

शहादा विभागातील वीजबिल वाटप हे संबंधित व्यवस्थेकडून हेतूपुरस्सर विलंबाने केले जात आहे. त्याबाबत माहिती घेतली असता शहादा शहरात एका व्यक्तीकडे बिलांचे वाटप करण्याचे काम दिले गेले आहे. तीच परिस्थिती ग्रामीण भागाचीही आहे. जरी महावितरणतर्फे ग्राहकांना एसएमएस व ई-मेलद्वारे थकबाकी भरण्यासंदर्भात वेळोवेळी निर्देश दिले जात असले. तरी सर्वच ग्राहकांकडे ई-मेल आयडी व मोबाईल आहे असे नाही आणि नेटवर्क अभावी अनेक वेळा ग्राहकांना वीज खंडित करण्याबाबतची सूचना मिळत नाही. यामुळे थकबाकीदार ग्राहकांकडून बिले वेळेवर भरली जात नसल्याने थकबाकीदारांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे दिसत आहे. अशातच महावितरणकडून होत असलेल्या धडक कारवाईने ग्राहक आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये वादविवाद निर्माण होत असल्याचे दिसून येते.

लॉकडाऊननंतर आता जनजीवन काहीसे पूर्वपदावर येत असल्याचे दिलासादायक चित्र असतानाच तालुक्यात कोरोना विषाणूने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या उद्रेकामुळे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी रात्रीची संचारबंदी तसेच प्रत्येक शनिवारी व रविवारी संपूर्ण जनता कर्फ्यूचा आदेश दिला आहे. त्यामुळे पुन्हा रोजगाराचे संकट उभे ठाकले आहे. अशात सर्व ग्राहकांना वीजबिले भरताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे वीजजोडणी खंडित करण्यापूर्वी ग्राहकांना किमान आठ दिवस आधी लिखित स्वरूपात सूचना देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे आम्ही करीत आहोत.

तसेच महावितरणतर्फे स्वतंत्र यंत्रणेमार्फत ग्राहकांचे वीज मीटर रीडिंग घेतले जात आहे. सदरची यंत्रणा कधीही दिलेल्या तारखेला रिडिंग घेत नसल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. शहरात वीज मीटर हे घराच्या बाहेरील भिंतीवर महावितरणनेच लावले असताना वीजबिलात मीटर रीडिंग उपलब्ध नाही असे होऊच शकत नाही. यंत्रणेच्या चुकीमुळे महावितरणकडून अंदाजित युनिटचे बिल ग्राहकांच्या माथी मारण्यात येत आहे. प्रत्यक्षात ही चूक महावितरणने नेमलेल्या यंत्रणेकडून झालेली असल्याने यापुढे यंत्रणेने वेळेवर वीज मीटर रिडिंग घेतले नाही तर त्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांचेवर निश्चित करून त्या बिलांची वसुली संबंधित यंत्रणेकडून करावी तसेच या सर्व प्रकाराची चौकशी वरिष्ठ पातळीवरून होणे आवश्यक आहे.

निवेदनावर जिल्हाध्यक्षा वंदना तोरवणे, शहादा तालुकाध्यक्ष प्रा. डी. सी. पाटील, कार्याध्यक्ष डॉ. खलिल शाह, सचिव प्रा. विजय येवले, खजिनदार किन्नरी सोनार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.