इतरही कोविड रुग्णालयांच्या बिलांची तपासणी करण्याची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:30 IST2021-04-24T04:30:54+5:302021-04-24T04:30:54+5:30

शहादा येथील कारवाईचे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. या रुग्णालयाच्या कारवाईसंदर्भात जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार प्राधिकृत केलेल्या ...

Demand for scrutiny of other Covid hospital bills also increased | इतरही कोविड रुग्णालयांच्या बिलांची तपासणी करण्याची मागणी वाढली

इतरही कोविड रुग्णालयांच्या बिलांची तपासणी करण्याची मागणी वाढली

शहादा येथील कारवाईचे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. या रुग्णालयाच्या कारवाईसंदर्भात जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार प्राधिकृत केलेल्या यंत्रणेने हॉस्पिटलमध्ये अलगीकरणात असलेल्या रुग्णांना इतर कोविड रुग्णालयात दाखल करावे व धन्वंतरी हॉस्पिटलकडून सदर रुग्णांचे त्याबाबतचे कोणतेही देयक आकारण्यात येऊ नये. हॉस्पिटलमधील रुग्णांना कोविड रुग्णालयात दाखल करताना त्यांची गैरसोय होणार नाही आणि त्यांच्या उपचारात खंड पडणार नाही याची दक्षता घ्यावी. तोपर्यंत धन्वंतरी रुग्णालयातच रुग्णांवर उपचार करण्यात यावेत. याबाबत घटना व्यवस्थापकांनी दक्षता घ्यावी. घटना व्यवस्थापकांनी अतिगंभीर रुग्णांना त्यांच्या इच्छेनुसार इतरत्र दाखल करावे अथवा धन्वंतरी रुग्णालयातच उपचार पूर्ण होईपर्यंत ठेवण्यात यावे. सदर रुग्णांची नियमित तपासणी व उपचार पद्धती सुरू ठेवण्यात यावी. आदेशानंतर सदर रुग्णालयात नवीन रुग्ण दाखल करू नये. रुग्णालयाची बिलाबाबतची कागदपत्रे घटना व्यवस्थापकांनी ताब्यात घ्यावीत व तपासणी करावी. रुग्णांचे अवाजवी देयक आकारले आहे का, याबाबत त्यांच्या नातेवाईकांकडून चौकशी करावी व चौकशीत अवाजवी देयक आकारल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित रुग्णालयाच्या संचालकावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी व अहवाल सादर करावा. सद्यस्थितीत दाखल सर्व रुग्ण उपचाराअंती बरे झाल्यानंतर सदर हॉस्पिटलवरील प्राधिकृत अधिकारी यांनी संयुक्तरीत्या कार्यवाही करू हॉस्पिटल सील करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Demand for scrutiny of other Covid hospital bills also increased