सिनेमागृह सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:31 IST2021-07-28T04:31:56+5:302021-07-28T04:31:56+5:30

कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्राला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. यातून फिल्म इंडस्ट्री व सिनेमागृह मालकांनाही आर्थिक झळ पोहोचली आहे. ...

Demand for permission to start a cinema | सिनेमागृह सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी

सिनेमागृह सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी

कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्राला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. यातून फिल्म इंडस्ट्री व सिनेमागृह मालकांनाही आर्थिक झळ पोहोचली आहे. शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करीत १६ महिन्यांपासून सिनेमागृह बंद आहेत. या काळात वीज बिल भरणे, जीएसटी कर, देखभाल आदी खर्च करीत विरोध न करता शासनाला सहकार्य केले आहे. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने सर्वच व्यवसाय टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. त्यामुळे शासनाने सिनेमागृह सुरू करण्यास परवानगी द्यावी. त्यामुळे सिनेमागृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोजगार मिळून मालकांचेही आर्थिक नुकसान टळणार आहे. १६ महिन्यांपासून सिनेमागृह बंद असताना शासनाकडून कुठलीही मदत मिळालेली नाही. त्यामुळे विजेचे बिल, जीएसटी कर, प्रॉपर्टी टॅक्स आदींमध्ये सवलत मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन नंदुरबार येथील मिराज सिनेमागृहाचे मालक आनंद जैन, अमर सिनेमागृहाचे मालक अनिल सोनार, शहादा येथील मनोरांजन चित्रमंदिराचे मालक राकेश सुभाष पटेल यांनी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना दिले.

Web Title: Demand for permission to start a cinema