माध्यमिक कर्मचाऱ्यांना कोविड लसीकरणात सहभागी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:55 IST2021-03-13T04:55:59+5:302021-03-13T04:55:59+5:30

जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग नियमित सुरू असून, विद्यार्थ्यांना अध्यापन कार्य सुरू आहे‌. प्रशासकीय सेवेत कामकाज करणारे ...

Demand for participation of secondary staff in covid vaccination | माध्यमिक कर्मचाऱ्यांना कोविड लसीकरणात सहभागी करण्याची मागणी

माध्यमिक कर्मचाऱ्यांना कोविड लसीकरणात सहभागी करण्याची मागणी

जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग नियमित सुरू असून, विद्यार्थ्यांना अध्यापन कार्य सुरू आहे‌. प्रशासकीय सेवेत कामकाज करणारे अधिकारी, कर्मचारी आणि प्राथमिक शिक्षक यांचे कोविड लसीकरण जिल्ह्यात सुरू आहे. मात्र, नंदुरबार जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड लसीकरणापासून वंचित ठेवले जात आहे. प्रशासकीय यंत्रणेने याबाबतीत कुठलेही नियोजन केलेले दिसून येत नाही. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रोगाचे प्रमाण वाढत असताना विद्यार्थ्यांना कर्मचाऱ्यांपासून आजाराचे संक्रमण होण्याचा धोका आहे. यासाठी नंदुरबार जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनांच्या वतीने नंदुरबार प्रशासनाने कोविडचे लसीकरण तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा रुग्णालय मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, सचिव पुष्पेंद्र रघुवंशी, उपाध्यक्ष सुनील भामरे, महेंद्र फटकाळ, रफीक जहांगीरदार, कपूरचंद मराठे, कोषाध्यक्ष डी. डी. साळुंके, प्रसिद्धीप्रमुख मनोहर साळुंके उपस्थित होते.

Web Title: Demand for participation of secondary staff in covid vaccination