शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी रखडलेली हाताेडा पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:32 IST

तळोदा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हातोडा पाणीपुरवठा योजनेचे काम जवळपास ७० ते ७५ टक्के झाले आहे. परंतु वेगवेगळ्या भागात नवीन ...

तळोदा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हातोडा पाणीपुरवठा योजनेचे काम जवळपास ७० ते ७५ टक्के झाले आहे. परंतु वेगवेगळ्या भागात नवीन पाईपलाईन, जलकुंभ व तापी नदी येथे राहिलेल्या किरकोळ कामासाठी ही योजना गेल्या दोन अडीच वर्षांपासून रखडली आहे. यासाठी लागणारा निधी उपलब्ध होत नसल्यामुळे योजनेचे कामही मार्गी लागत नसल्यामुळे तळोदा शहरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निधीसाठी बुधवारी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली होती. त्याचबरोबर तळोदा शहरात काही ठिकाणी पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे नवीन कूपनलिकांची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यावेळी मंत्री पाटील यांनी तळोदा शहराच्या पाणी योजनेसाठी जेवढा निधी लागेल तेवढा उपलब्ध करून देण्याची हमी पदाधिकाऱ्यांना दिली. एवढेच नव्हे तर पुढील महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष नंदुरबार किंवा तळोदा येथे येणार असून, तळोदा शहराच्या हातोडा पाणीपुरवठा योजनेची सद्यस्थितीची माहिती घेऊन ही योजना कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे त्यांनी सांगितले. या वेळी मंत्र्यांना तापी पाणीपुरवठा योजनेचे निवेदन ही देण्यात आले. याप्रसंगी सेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे, तळोदा शहर प्रमुख जितेंद्र दुबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पटेल, ज्येष्ठ कार्यकर्ते आनंद सोनार, नितीन ठाकरे उपस्थित होते. दरम्यान या पदाधिकाऱ्यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेऊन तळोदा शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

नगरपालिकेचा १३ कोटी रूपयांचा प्रस्ताव पडून

तळोदा शहरातील तापी पाणीपुरवठ्याच्या विस्तारित योजनेसाठी येथील नगरपालिकेने गेल्या दोन अडीच वर्षांपूर्वी साधारण १३ कोटीचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे दाखल केला आहे. परंतु कार्यवाही अभावी हा प्रस्ताव तसाच पडून आहे. त्यासाठी नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी यंत्रणेकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, अजूनही दाद मिळत नसल्याची शहरवासीयांची व्यथा आहे. निधी अभावी या योजनेचे ही घोंगडे भिजत पडले आहे. वास्तविक योजनेचे काम ७० ते ७५ टक्के झाले आहे. हत्ती निघून केवळ शेपूटच उरल्याची स्थिती योजनेची आहे. निधीसाठी लोकप्रतिनिधींनी देखील पूर्ण दुर्लक्ष केल्याने तळोदा शहरातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. आधीच शहरातील लोकांना कूपनलिकांचे क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. आता जलशुद्धीकरण प्रकल्प उपलब्ध असताना केवळ किरकोळ कामामुळे तो ही तसाच धूळखात पडला आहे.

निधीअभावी शहरातील रखडलेल्या हातोडा पाणीपुरवठा योजनेच्या निधी करिता बुधवारी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली होती. त्यांनी योजनेची माहिती जाणून सकारात्मक चर्चा करत पुढच्या महिन्यात प्रत्यक्ष तळोदा येथे येऊन आढावा घेण्याचे सांगून हा प्रश्न मार्गी लावण्याचे सांगितले.

- जितेंद्र दुबे, शिवसेना तळोदा शहर प्रमुख.