शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोलर पंप योजनेला गती देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:09 IST

शाळा सुरू होणार असल्याने उत्साह बोरद : २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील विविध भागात पाचवीनंतरचे वर्ग सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ...

शाळा सुरू होणार असल्याने उत्साह

बोरद : २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील विविध भागात पाचवीनंतरचे वर्ग सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात उत्साह आहे. तळोदा तालुक्यातील विविध गावांमध्ये शाळा सुरू करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

चिंचपाडा येथे विविध स्पर्धा

चिंचपाडा : नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील वनवासी विद्यालय व चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा झाला. या निमित्त निबंधलेखन, कथाकथन, काव्यवाचन आणि ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य बी.एम. निकुंभ होते. प्रसंगी ग्रंथपाल सुभाष वळवी, ए.के. लोहार, प्रा.आर.डी. सोनवणे, एस.आर. परदेशी, एन.एन. भागवत, पी.जी. देसले, संभाजी गावीत उपस्थित होते. पूनम पाडवी, रिना निकम, कुसुम वसावे, अंकुश वळवी, गायत्री वसावे, किशोरी पाडवी, काजल मोरे, सृष्टी जैन या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.

समस्या कायम

नंदुरबार : शहरालगतच्या वाघोदा शिवारात रस्ते नसल्याने नागरिकांचे हाल कायम आहेत. याबाबत नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा करूनही कारवाई करण्यात आलेली नाही. लक्ष देण्याची मागणी आहे.

गटारी स्वच्छ करा

नंदुरबार : शहरालगतच्या होळतर्फे हवेली शिवारात गटारी स्वच्छ करण्याची मागणी आहे. गुरुकुल नगर एक आणि दोन याठिकाणी गटारी तुंबल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो.

एकलव्य विद्यालयात मतदान दिन उपक्रम

नंदुरबार : एकलव्य विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा झाला. विद्यार्थ्यांना मतदारांची कर्तव्ये, मतदानाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यालयाचे शिक्षक संतोष पाटील यांनी राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ दिली. ज्येष्ठ शिक्षक अशोक पाटील, हारून कागझी, अश्फाक मन्सुरी, वसंत वसईकर, सुनील पाटील, धोंडीराम शिनगर, दीपक माळी, शैलजा कापडिया, जयश्री खैरनार, किरण रघुवंशी, मोनाली त्रिकाळ उपस्थित होते.

मजुरांना रोजगार

नंदुरबार : तालुक्यातील विविध भागात कापूस वेचणी तसेच विविध शेतीकामे संपली आहेत. यातून मजुरांचा ओढा आता मिरची तोडणीसाठी असल्याने कामांना गती आली आहे. यातून तालुक्यातील मिरची उत्पादकांच्या शेतातील कामांना गती आल्याची माहिती देण्यात आली आहे.

दुर्गम भागात गारठा

धडगाव : सातपुड्याच्या दुर्गम भागातही थंडीचे पुनरागमन झाले आहे. यातून गावपाड्यांवरचे पुन्हा शेकोट्या पेटू लागल्या आहेत. तालुक्यातील विविध भागात गारठ्यामुळे जनजीवनावरही परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. येत्या मार्चपर्यंत थंडी टिकून राहील, असा अंदाज आहे.

रजाळे येथे उपसरपंच निवड

नंदुरबार : तालुक्यातील रजाळे येथे उपसरपंचपदी शिवसेनेचे मनोज चिंधू पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच रेखाबाई पाटील यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सभेत मनोज पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. प्रसंगी सदस्य भाऊराव मराठे, गुलाब भिल, सोनाली पाटील, भटू मराठे, इंदूबाई वाघ, अलका भिल, ग्रामसेवक चंद्रसिंग ठाकरे उपस्थित होते. शिवसेना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी, कृउबाचे माजी सभापती किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनात ही निवड करण्यात आली.

सुटीमुळे होणार गर्दी

ब्राह्मणपुरी : २६ जानेवारी रोजी सुटी असल्याने राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे गर्दी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यासह जवळील जिल्ह्यातील नागरिक येथे एकदिवसीय सहलींसाठी येण्याची शक्यता असून, यातून पर्यटन उद्योगाला लाभ होणार आहे.