शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

आजीबाईंचा बटवा अन् कोेरोना हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST

नंदुरबार : कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. या लाटेत वैद्यकीय उपचारात अनेक बदल पहावयास मिळाले. यात आयुर्वेदाने वेगळी जागा ...

नंदुरबार : कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. या लाटेत वैद्यकीय उपचारात अनेक बदल पहावयास मिळाले. यात आयुर्वेदाने वेगळी जागा निर्माण करुन इतिहासजमा झालेला आजीबाईंचा बटवा पुन्हा एकदा उघडून दिला. आजीबाईंच्या या बटव्यातील वस्तू घरोघरी आजही वापरात असल्याने त्यातून अनेकजण बरे झाल्याचे ठोस दावे केले जात आहेत.

२१ व्या शतकाला गवसणी घालत पुढे जाणाऱ्या मानवाला कोरोनाने ब्रेक लावला आहे. यातून स्वत:चा बचाव करण्यासाठी धडपड सुरू असलेल्या माणसाला पुन्हा एकदा इतिहासाची आठवण झाली असून घरगुती उपचार पुन्हा एकदा कामी येत असल्याचे घरोघरी दिसून आले आहे. पूर्वीच्या काळी घरात कुणी आजारी पडलं तर आजीकडे औषध हमखास मिळत होते. अनुभवसंपन्न अशा आजीबाईचा हा बटवा चर्चेचा विषय ठरत होता. दरम्यान कालांतराने स्मृतीत गेेेलेला हा आजीबाईचा बटवा कोरोना काळात आधारस्तंभ ठरला आहे. यातील काढे, घरगुती उपाय, हळदीचा वापर, सर्दी आणि तापाला आवर घालण्यासाठीची विविध मिश्रणे यांच्या मात्रा नागरीक घरोघरी घेवू लागले आहेत.

गरम पाण्याचा वापर करणे हे या काळात योग्यच आहे. नियमित गरम पाण्याचे सेवन केल्यास कोरोनासारखे आजार लांब राहतील. आजारात जीवन सत्त्व असलेल्या भाज्या हव्यात. यातून आरोग्य चांगले राहिल.

-वत्सलाबाई माळी, नंदुरबार

घरात गवती चहा, सुंठ, आलं आदी पदार्थ असणे गरजेचे आहे. घशातील खवखव घालवण्यासाठी आल्याचा वापर केला गेला पाहिजे. यातून खवखव जाऊन भीती कमी होते.

-सुमनबाई जोशी, नंदुरबार.

ज्येष्ठ मधाचे पाणी, हळदीचे पाणी यासह काढा तयार करुन घेतल्यास उत्तम राहिल. गरम पाण्याचा वापर केला पाहिजे. अनेक वस्तू बाजारात सहज मिळतात. त्या घरी आणून ठेवाव्या.

-यमुनाबाई पाटील, नंदुरबार.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नागरिक प्रयत्न करत आहेत. यात साजूक तूप व घरगुती मसाले हे सहाय्यकारीच आहेत. कोरोनापासून लांब राहता यावे यासाठी गुळवेल, अश्वगंधा, आल, लसूण, दालचिनी, मिरे, लवंग यांचा काढा तयार केला जात आहे. रक्त शुद्धीकरणासाठी हळदीचा वापर वाढवला जात आहे. नाकात तुपाचा वापर होत आहे. हे सर्व उपचार पूर्वापार चालत आलेले आहेत. - डॉ. वैशाली काणे, आयुर्वेद तज्ज्ञ

दुधात हळद घ्यावी

दुधात हळद टाकून पिले तर रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. केवळ दूध पिले तर शरीरात कफ निर्माण होऊ शकतो. मात्र त्यात चिमूटभर हळद घातली तर कफ होत नाही.

गुळवेल, अश्वगंधा, आवळा -

आयुर्वेदात गुळवेल, अश्वगंधा, आवळा या वनस्पतींना महत्त्वाचे स्थान आहे. या वनस्पतींच्या वापराने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. या वनस्पती काढ्याच्या स्वरूपात सेवन करू शकतात. तसेच गोळ्यांचे सेवन महत्त्वाचे ठरते.

धुपवन चिकित्सा

आयुर्वेदात योग्य आहरासोबतच स्वच्छतेला महत्व आहे. त्यासाठी धुपवन चिकित्सा केली जाते. ग्रामीण भागात अंगण झाडून कचरा पेटवला जातो. त्यामुळे वातावरण शुद्ध होण्यास मदत होते.