नंदुरबार व धडगाव पालिकांसाठी अत्याधुनिक रुग्णवाहिकांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 11:57 IST2021-02-15T11:57:05+5:302021-02-15T11:57:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबारसह धडगाव-वडफळ्या नगरपालिका व नगरपंचायतीसाठी अत्याधुनिक स्वरूपाची रुग्णवाहिका देण्यात   आली आहे. माजी आमदार ...

Dedication of state-of-the-art ambulances for Nandurbar and Dhadgaon Municipalities | नंदुरबार व धडगाव पालिकांसाठी अत्याधुनिक रुग्णवाहिकांचे लोकार्पण

नंदुरबार व धडगाव पालिकांसाठी अत्याधुनिक रुग्णवाहिकांचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबारसह धडगाव-वडफळ्या नगरपालिका व नगरपंचायतीसाठी अत्याधुनिक स्वरूपाची रुग्णवाहिका देण्यात   आली आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांच्या विकास   निधीतून दोन रुग्णवाहिका घेतल्या आहेत.
नंदुरबार पालिका हद्द आणि धडगाव-रोषमाळ नगरपंचायत हद्दीतील रुग्णांच्या सोयीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून १५ लाख रुपये खर्च करून या दोन रुग्णवाहिका प्रस्तावित केल्या होत्या. त्यानुसार त्या उपलब्ध झाल्या आहेत. 
नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन मनोज रघुवंशी यांच्या हस्ते फित कापून या रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आल्या. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी स्वत: रुग्णवाहिकेत फेरफटका मारून त्यातील अत्याधुनिक सुविधांची पहाणी केली. रुग्णवाहिकेत ॲाक्सीजन, वातानुकुलीत यंत्रणा, इतर आधुनिक सामुग्री उपलब्ध आहेत. जनतेच्या हिताच्या दृष्टीने अल्प दरात ती उपलब्ध करून दिली जाणार   आहे.
यावेळी देवेंद्र जैन, कुणाल वसावे, कैलास पाटील, परवजेखान, किशोर पाटील, विलास रघुवंशी, यशवर्धन रघुवंशी, योगेश चौधरी, गजेंद्र शिंपी, राजेंद्र माळी, विजय माळी, चेतन वळवी आदींसह नगरसेवक उपस्थित होते. 

Web Title: Dedication of state-of-the-art ambulances for Nandurbar and Dhadgaon Municipalities