शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा येथील मंदिरे व धार्मिक स्थळे आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 13:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे आठ दिवस बंद ठेवण्याची सूचना ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे आठ दिवस बंद ठेवण्याची सूचना शनिवारी येथे झालेल्या बैठकीत देण्यात आल्या. २२ मार्चचा जनता कर्फ्यू यशस्वी करण्याचे आवाहन करून आठ दिवस गावात मांस विक्री, भेळपुरी, पानटपऱ्या बंद ठेवण्याचे बैठकीत सांगण्यात आले.कोरोनाला रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी येथील ग्रामसचिवालयात शनिवारी सकाळी सरपंच सुदाम ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीला जि.प.चे माजी सदस्य रामचंद्र पाटील, उपसरपंच भरत पाटील, ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील, तलाठी डी.एम. चौधरी, वि.का. सोसायटीचे चेअरमन हरी पाटील, जमादार सुनील पाडवी, वैद्यकीय अधिकारी डॉ.मिलिंद अहिरे, प्रशांत बावस्कर, संजय चौधरी, माजी सरपंच भावडू ठाकरे, मोतीराम बर्डे, नंदकिशोर पटेल, ग्रा.पं. सदस्य महेंद्र भोई, रफीक खाटीक, दिलीप चौधरी, जयगणेश पाटील, व्यापारी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते. बैठकीत रविवारचा जनता कर्फ्यू काटेकोरपणे पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. गावातील दवाखाने व मेडिकल दुकाने उघडे राहतील. इतर सर्व व्यवहार, दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ.अहिरे यांनी कोरोना विषाणूपासून संसर्ग कसा होतो, बचाव कसा करावा, कोणती दक्षता घ्यावी, ही साखळी तोडण्यासाठी रविवारचा जनता कर्फ्यू किती महत्त्वाचा आहे याची माहिती दिली.रामचंद्र पाटील यांनी बसस्थानक परिसरातील हॉटेल, पाणीपुरी, भेळपुरी व इतर दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद करण्यासंदर्भात चर्चा करून तशा सूचना दिल्या. हरी पाटील यांनी गावातील इतर दुकाने, उघड्यावरील मांस विक्री बंद करावी, असे सांगितले. नंदकिशोर पटेल यांनी सर्व धार्मिकस्थळे आठ दिवसांसाठी बंद ठेवून मंदिरातील पूजाविधी बंद करावी, असे सूचविले. जमादार सुनील पाडवी यांनी जो व्यक्ती ग्रामपंचायतीचे आदेश मानणार नाहीत. तसेच उघड्यावर मांस विक्री करेल, आदेशाचे पालन करणार नाही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. ग्रामविकास अधिकारी बी.जी.पाटील यांनी सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे, मांस विक्रीची दुकाने बंद करण्यासंदर्भात परिपत्रक काढून सार्वजनिक ठिकाणी सूचनाफलक लिहून, गावात दवंडी देऊन, रिक्षा फिरवून सर्व ग्रामस्थांनी कर्फ्यूत सहभागी व्हावे, असे सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, २२ मार्च रोजी देशभरातील जनतेला जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. प्रकाशा येथे शनिवारी झालेल्या बैठकीत उपस्थित मान्यवरांनी जनता कर्फ्यूत का सहभागी व्हावे, त्याचे फायदे काय याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. या जनता कर्फ्यूमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले.