वाटवी येथील शाळेची भिंत अंगावर कोसळल्याने बालिकेचा मृत्यू

By Admin | Updated: April 25, 2017 13:37 IST2017-04-25T13:37:40+5:302017-04-25T13:37:40+5:30

नवापूर तालुक्यातील वाटवी येथे शाळेची भिंत व प्रवेशद्वार अंगावर कोसळल्याने बालिका जखमी झाली होती़ या बालिकेवर सुरत येथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला़

The death of the child due to the collapse of the school wall at Watti | वाटवी येथील शाळेची भिंत अंगावर कोसळल्याने बालिकेचा मृत्यू

वाटवी येथील शाळेची भिंत अंगावर कोसळल्याने बालिकेचा मृत्यू

 नंदुरबार,दि.25- नवापूर तालुक्यातील वाटवी येथे शाळेची भिंत व प्रवेशद्वार अंगावर कोसळल्याने बालिका जखमी झाली होती़ या बालिकेवर सुरत येथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला़ 

मेहंदीपाडा ता़ नवापूर येथील  आरूषी दिपक वळवी ही सहा वर्षाची चिमुरडी 31 मार्च रोजी दुपारी वाटवी गावातील मराठी शाळेजवळ लहान मुलांसोबत खेळत असताना तिच्या अंगावर शाळेचे प्रवेशद्वार आणि भिंत कोसळली होती़ या घटनेनंतर तिला तात्काळ सुरत येथील सामान्य रूग्णालयात हलवण्यात आले होत़े मात्र त्याठिकाणी उपचार सुरू असताना   तिचा 2 एप्रिल रोजी मृत्यू झाला होता़ या घटनेच्या तब्बल 24 दिवसांनंतर सुरत येथून कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर विसरवाडी पोलीस ठाण्यात गुजरात राज्यातील खडोदरा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक धनजी वालिया यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े

Web Title: The death of the child due to the collapse of the school wall at Watti