शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा घरफोडीचे सत्र सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 11:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा/नंदुरबार : जिल्ह्यात दिवसा घरफोडी होण्याचे सत्र सुरुच असून औरंगपूर ता़ शहादा येथे पाच तोळे सोने ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा/नंदुरबार : जिल्ह्यात दिवसा घरफोडी होण्याचे सत्र सुरुच असून औरंगपूर ता़ शहादा येथे पाच तोळे सोने व सव्वा तीन लाख रुपये रोख चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना उजेडात आली आहे़ तत्पूर्वी सोमवारी पहाटेच्या सुमारास नंदुरबार शहरातील शिवाजीनगरात चोरीची घटना समोर आली होती़औरंगपूर, ता.शहादा येथील शेतकरी नामदेव गोविंदा पाटील हे सोमवारी सकाळी लग्न समारंभानिमित्त कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. इतर ठिकाणीही हळदीचा कार्यक्रम असल्याने त्यांना रात्री परतण्यास उशिर झाला़ या संधीचा चोरट्यांनी फायदा घेत त्यांच्या राहत्या घराच्या छतावरील दरवाजाचे दार उघडून चोरट्यांनी पाठीमागील दरवाज्याचे कुलूप तोड घरात प्रवेश केला होता़ आत प्रवेश करत त्यांनी कपाट फोडून आत ठेवलेल्या ९० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, ५४ हजाराची सोन्याची चैन, ४८ हजार रुपये रोख असा १ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज आणि घरात ठेवलेले १ लाख १५ हजार रुपये रोख असा तीन लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल घेत चोरट्यांनी पळ काढला होता़नामदेव पाटील हे घरी परत आल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले तर आतील बाजूस कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकण्यात आल्याचे दिसून आले़ घटनेनंतर रात्री उशिरा शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ मंगळवारी सकाळी येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह श्वानपथक आणि ठसे तज्ञ यांनी भेट देत पाहणी केली़ परंतू त्यांच्या हाती ठोस असे काहीही लागलेले नसल्याची माहिती देण्यात आली आहे़शिवाजी नगरात घरफोडीनंदुरबार शहरातील शिवाजी नगरात प्लॉट क्रमांक ३९ अ या घरात चोरट्यांनी प्रवेश करत कपाट फोडून ५५ हजार रुपये रोख आणि ५६ हजार ५०० रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने व कपडे असा ऐवज लंपास केला़ घरमालक पृथ्वीराज सावंत हे सोमवारी सकाळी घरी परत आल्यानंतर हा प्रकार उजेडात आला़ याबाबत पृथ्वीराज जिजाबराव सावंत यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस निरीक्षक दिवटे करत आहेत़ घरफोडीच्या माहितीनंतर पोलीस उपअधिक्षक रमेश पवार व पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली होती़शहरात रविवारी भरदिवसा चोरीची घटना घडल्यानंतर नागरिकांनी चिंता व्यक्त केली होती़ त्यानंतर लागलीच शिवाजी नगरातील घटना उजेडात आल्याने एकच खळबळ उडाली आहे़