शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

धवळीविहीर-हलालपूर रस्त्यावरील पुलाला भगडाद पडल्याने वाहतुकीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातील धवळीविहीर ते हलालपूर दरम्यान असलेल्या नदीवरील पुलाला पडलेलं भगदाड वर्षभरानंतरदेखील ‘जैसे थे’च ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा तालुक्यातील धवळीविहीर ते हलालपूर दरम्यान असलेल्या नदीवरील पुलाला पडलेलं भगदाड वर्षभरानंतरदेखील ‘जैसे थे’च आहे. यंदाच्या पावसाळ्यात नदीला पूर आल्यास धवळीविहीर गावाचा तालुका व मुख्यालयाशी संपर्क तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुलाची तत्काळ दुरूस्ती न झाल्यास धवळीविहीर ग्रामस्थांकडून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.गेल्यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे तळोदा तालुक्यातील धवळीविहीर ते हलालपूर दरम्यान असणाऱ्या नदीवरील पुलाला भले मोठे भगदाड पडले होते. या पुलाची उंची कमी असल्याने व गेल्यावर्षी सातत्याने झालेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे महिनाभर पुलावरून पाणी वाहत होते. अश्या परिस्थिती या पुलाला पडलेले हे जीवघेणे भगदाड अधिकच धोकेदायक बनले होते. पुलावरील वाहत्या पाण्यात रस्त्याचा अंदाजा घेत व त्या भगदाडला चुकवीत धवळीविहीर ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी महिनाभर प्रवास केला होता.नदीचे पाणी कमी झाल्यानंतर पुलावरून वाहणारे पाणी बंद झाले मात्र पुराच्या पाण्यामुळे पुलाला मोठे भगदाड पडल्याने पुलाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे धवळीविहीर ग्रामस्थांना तारेवरची कसरत करीत व जीव मुठीत घेऊन अनेक दिवस पुलावरून मार्गक्रमण करावे लागले. पुलावरून वाहणारे पाणी बंद झाल्यावरदेखील पुलावरून प्रवास करणे हे तेवढेच धोकेदायक होते. असे असतांनाही वर्षभर धवळीविहीर ग्रामस्थांनी या धोकेदायक पुलावरून मार्गक्रमण केले. पुलाला पडलेले हे जीवघेणे भगदाड बुजवून पुलाची दुरूस्ती केली जाईल, अशी ग्रामस्थांना अपेक्षा होती. मात्र वर्ष उलटूनही या पुलाच्या दुरूस्तीसाठी प्रत्यक्ष कोणत्याच प्रकारचे काम न झाल्याने ग्रामस्थांची अपेक्षा फोल ठरली आहे.दरम्यान, या पुलाला पडलेला हा जीवघेणी खड्डा सहज वाहनधारकांच्या लक्षात येत नसल्याने या खड्यात वाहनधारक पडू नये म्हणून कचºयाचे ढीग टाकून हे भगदाड बुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र कचºयाने हे भगदाड बुजविणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर पुलाच्या मार्गावर कचºयाचा ढीग करून पुलावरून जाणारा मार्गच बंद करण्यात आला होता. मात्र धवलीविहीर ग्रामस्थांनी रस्ता नसल्याने या धोकेदायक पुलावरून मार्गक्रमण करण्याचा धोका पत्करून मार्गावरील कचºयाचा ढीग हटविण्यात आला होता व रहदारीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला होता.पुलाला पडलेले हे भगदाड वर्ष होवूनही त्याच स्थितीत असून, या नदीला पुन्हा पावसाळ्यात पूर आला तर धवळीविहिर ग्रामस्थांचा तालुका व मुख्यालयाशी संपर्क तुटणार आहे. धवळीविहीर ग्रामस्थांना तळोदा येथे येण्यासाठी गणेश बुधावल फाटा एक दुसरा कच्चा मार्ग आहे. परंतु तो मातीचा रस्ता असल्याने पावसाळ्यात याठिकाणी चिखल साचत असल्याने तो कोणत्याही उपयोगाचा ठरत नाही. मोटरसायकल सुद्धा या मार्गाने व्यवस्थित जाऊ शकत नाही. अशा परिस्थिती या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्व लक्ष देणे गरजेचे होते. परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी या पुलाच्या दुरवस्थेकडे गांभीर्याने पाहिलेले नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. या पुलाची तात्काळ दुरूस्ती न केल्यास धवळीविहीर ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे सांगितले जात आहे.

तालुका व मुख्यालयाच्या ठिकाणी जाण्यासाठी धवळीविहीर ते हलालपूर दरम्यान असणाऱ्या नदीवरील पुलाचा एकमेव मार्ग आहे. मात्र या पुलाला पडलेल्या भगदाडामुळे पावसाळ्यात तालुक्याशी आमचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. तसेच या भगदाडमुळे जीवितहाणी घडण्याची शक्यता नाकाता येत नाही. त्यामुळे संबंधितांनी याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ या पुलावरील भगदाड त्वरित बुजवून धवळीविहीर व हलालपूर वासीयांना सोयीचे करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. -सुभाष पावरा, ग्रामस्थ, धवळीविहीर, ता.तळोदा