शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

प्राण्यांसाठी ‘दाना-पाणी एटीएम’ची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : भुकेल्या प्राण्यांना भोजनाची व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी येथील संकल्प ग्रुपतर्फे आचार्य तुलसी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : भुकेल्या प्राण्यांना भोजनाची व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी येथील संकल्प ग्रुपतर्फे आचार्य तुलसी मार्गावर दाना-पाणी एटीएमची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जनावरांसाठी पाण्याचे कुंड ठेवण्यात आले. ग्रुपतर्फे राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.येथील सामाजिक संकल्प ग्रुपतर्फे भुकेल्या प्राण्यांसाठी अन्नाची सोय व्हावी याकरिता अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. अनेक नागरिक घरातील उष्टे व शिल्लक राहिलेले अन्न टाकून देतात. हे शिळे अन्न वाया न जाऊ देता त्याचा योग्य वापर व्हावा व त्याचप्रमाणे प्राण्यांना अन्न मिळावे यासाठी दाना-पाणी एटीएमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.ग्रुपतर्फे आवाहन करण्यात आले आहे की, याठिकाणी नागरिकांनी आपल्या घरातील शिळे अन्न आणून टाकावे. या अन्नाचा उपयोग भुकेल्या प्राण्यांना होणार आहे. यामुळे अन्नदान करण्यासह अन्नाचा योग्य वापर करण्याची संधी उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी याठिकाणी अन्नदान करावे.शहर व परिसरात मार्च महिन्यापासूनच उन्हाचा जोर वाढू लागल्याने प्राणी व पक्ष्यांना पाण्याची कमतरता भासते. जनावरांसाठी पाणी सहज उपलब्ध व्हावे याकरिता शहरातील वेगवेगळ्या १० ठिकाणी पाण्याचे कुंड ठेवण्यात आले आहेत. त्यात सदाशिवनगर, वृदांवननगर, शनिमंदिर, सुरभी संकुल, गजानन महाराज मंदिर, लोणखेडा या परिसराचा समावेश आहे. या कुंड्यांची जबाबदारी कुंड ठेवण्यात आलेल्या व शेजारी असणाºया घरमालकाला देण्यात आली आहे. घर मालकाने कुंडात रोज पाणी भरावयाचे आहे व तीन ते चार दिवसात कुंड स्वच्छ करण्याची स्वत:हून जबाबदारी घेतली आहे. तसेच संकल्प ग्रुपचे सदस्य गावात येता-जाता कुंडावर लक्ष ठेवून असतात. कुंड पाण्याने भरलेले व स्वच्छ आहे की नाही याची पाहणी करतात. या उपक्रमाबद्दल शहरवासीयाकडून संकल्प ग्रुपचे कौतुक करण्यात येत आहे व आमच्या परिसरातही कुंड लावा, अशी सर्वांकडून मागणी होत आहे. आगामी काळात शहरात अजून कुंड वाढवण्याचा संकल्प ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.