नुकसानीच्या पंचनाम्यासाठी गेलेल्या अधिका:यांना परतवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 12:41 PM2019-11-06T12:41:53+5:302019-11-06T12:42:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बलवंड : सडका शेतमाल मातीमोल भावात विकला तर कापसाची शेतातच बोंडे सडली असताना नुकसानीच्या पंचनाम्यासाठी तलाठी ...

Damaged officer: Returned to officer: | नुकसानीच्या पंचनाम्यासाठी गेलेल्या अधिका:यांना परतवले

नुकसानीच्या पंचनाम्यासाठी गेलेल्या अधिका:यांना परतवले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बलवंड : सडका शेतमाल मातीमोल भावात विकला तर कापसाची शेतातच बोंडे सडली असताना नुकसानीच्या पंचनाम्यासाठी तलाठी व कृषी विभागाच्या प्रतिनिधींनी सैताणे ता.नंदुरबार येथे भेट दिली. उशिराने आलेल्या या या कर्मचा:यांनी कोंब फुटलेली ज्वारी व मका दाखविण्यास  सांगितले. त्यामुळे संतप्त शेतक:यांनी त्यांना गावातून माघारी परतवून लावले.
नंदुरबार तालुक्यातील सैलाणे येथे सततच्या पावसामुळे शेतमाल व पिकांचे नुकसान झाले होते. परंतु या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी शासनाचा कुठलाही प्रतिनिधी तेथे पोहोचला नाही. त्यामुळे तेथील शेतक:यांचे नुकसान लोकमतने वृत्त प्रकाशित करीत शासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची दखल घेत तलाठी एस.व्ही.ईशी व कृषी विभागाच्या महिला प्रतिनिधी गोसावी यांनी नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी सैताणे गावाला भेट दिली. पंचनामा करण्यासाठी तेथील शेतकरी सहकार्य करीत होतेच, परंतु ईशी व गोसावी यांनी केवळ कोंब फुटलेली ज्वारी व मका दाखवा असे शेतक:यांचे सांगितले. 
आधिच नुकसानीने पावसामुळ ैहैेराण झालेल्या शेतक:यांना शेतक:यांनी कोंब फुटलेल्या ज्वारी दोखविण्याचे सांगताच त्या कर्मचा:यांवर संताप व्यक्त केला. शेतकरी व कर्मचा:यांमध्ये शाब्दीक वाद झाल्यानंतर शेतक:यांनी कर्मचा:यांना सैताण्यातून परत जाण्याचे सांगितले. दरम्यान गावातील सर्व शेतक:यांना शासनान जाहीर केले आहे. त्यानुसार सर्व शेतक:यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी तेथील शेतक:यांमार्फत करण्यात आली. त्यामुळे सैताणे येथील नुकसानीबाबत प्रशासकीय पातळीवर कुठली भूमिका घेतली जाते याकडे लक्ष लागले आहे.
 

Web Title: Damaged officer: Returned to officer:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.