पाऊस व वादळामुळे ज्वारी-मका पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 13:03 IST2020-08-28T13:03:30+5:302020-08-28T13:03:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील बुरीनमाळ नागझिरी या गावात पावसासोबत झालेल्या जोरदार वादळामुळे ज्वारी व मका पिकाचे ...

Damage to sorghum-maize crop due to rains and storms | पाऊस व वादळामुळे ज्वारी-मका पिकाचे नुकसान

पाऊस व वादळामुळे ज्वारी-मका पिकाचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील बुरीनमाळ नागझिरी या गावात पावसासोबत झालेल्या जोरदार वादळामुळे ज्वारी व मका पिकाचे मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे रोजगारासाठी गावाच्या बाहेर जाता येत नाही. त्यात कोरोनामुळे जीवनावश्यक वस्तूंची महागाई अशा चारही बाजूने संकटात असलेला शेतकरी यंदा पूर्णत: खरीप हंगामातील उत्पन्नावर अवलंबून आहे. त्यात शेतातून पिकविलेल्या ज्वारी व मका यावर वर्षभराचा कुटुंबाचा भार असतो.
मात्र शहादा तालुक्यातील बुरीनमाळ नागझिरी परिसरात पावसासोबत जोरदार वादळामुळे ज्वारी व मका पिकाचे संपूर्ण शेताचे नुकसान झाले आहे. या परिसरात फक्त पावसाळ्यात शेती केली जाते. ज्वारी व मका पिकाचे नुकसानीमुळे उत्पन्न येणार नसल्याने वर्षभर खायचे काय? असा प्रश्न या शेतकरी कुटुंबांपुढे उभा ठाकला आहे. संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन मका व ज्वारी पिकाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Damage to sorghum-maize crop due to rains and storms