बामखेडा परिसरात शेतांमध्ये पाणी साचल्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 12:52 IST2020-08-16T12:52:16+5:302020-08-16T12:52:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे परिसरातील शेतात पाणी साचले असून त्यामुळे नुकसान होण्याची भीती ...

Damage due to stagnant water in the fields in Bamkheda area | बामखेडा परिसरात शेतांमध्ये पाणी साचल्याने नुकसान

बामखेडा परिसरात शेतांमध्ये पाणी साचल्याने नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
बामखेडा : गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे परिसरातील शेतात पाणी साचले असून त्यामुळे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. श्रावण महिन्यातल्या पावसामुळे ‘कही खुशी कही गम’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पावसासोबत जोराचा वारा असल्याने ऊस, मिरची, पपई, कापूस आदी पिके कोलमडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. पावसाने दडी मारल्यामुळे पिकांची वाढ खुंटली होती. परंतु दोन दिवसात संततधारेमुळे पिकांची वाढ होण्यास मदत होईल. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पपईच्या शेतात पावसाचे पाणी साचले असून ते पाणी काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. साचलेले पाणी काढण्यासाठी शेतकºयांना ट्रॅक्टर पंपाचा वापर करावा लागला. यामुळे पपईचे पीक खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील आठवड्यात वादळ-वाºयासह पाऊस झाला होता. त्यावेळी शेतकºयांना शेतात साचलेले पाणी काढण्यासाठी ट्रॅक्टर पंपचा आधार घ्यावा लागला होता.

Web Title: Damage due to stagnant water in the fields in Bamkheda area