मकर संक्रातीनिमित्त प्रकाशातील केदारेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 01:09 PM2020-01-16T13:09:53+5:302020-01-16T13:09:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील दक्षिण काशी तीर्थक्षेत्र प्रकाशा येथे मकरसंक्रातीनिमित्त भाविकांची गर्दी उसळली होती़ तापी नदीत ...

Crowds of devotees rush to Kedarshwar temple in light of Makar Sankranti | मकर संक्रातीनिमित्त प्रकाशातील केदारेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

मकर संक्रातीनिमित्त प्रकाशातील केदारेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा तालुक्यातील दक्षिण काशी तीर्थक्षेत्र प्रकाशा येथे मकरसंक्रातीनिमित्त भाविकांची गर्दी उसळली होती़ तापी नदीत स्रान करुन केदारेश्वर मंदिरात भाविक दर्शन घेत होते़ सायंकाळी उशिरापर्यंत यामुळे केदारेश्वर मंदिराकडे जाणारे रस्ते गर्दीने फुलून गेले होते़
मकर संक्रांतीनिमित्त तापी नदीत स्रान करुन केदारेश्वराचे दर्शन घेण्याची परंपरा आहे़ भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने याठिकाणी मोठी गर्दी उसळते़ बुधवारी पहाटेपासूनच तापी नदीत भाविकांनी स्रान केले़ बहुसंख्य भाविकांकडून तिळ आणि उटण्याचा वापर करुन स्रान करण्याची परंपरा आहे़ यामुळे मकरसंक्रांतीच्या सकाळी या परिसरात उटण्याचा सुगंध दरवळत होता़ स्रानानंतर भाविका केदारेश्वर महादेव मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर, पुष्पदंतेश्वर, रत्नेश्वर आणि गावातील इतरांमध्ये दर्शन घेत संक्रांतीची पर्वणी साधली़ भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप रूप आले होते. मंदिर परिसरात तिर्थक्षेत्र विकासांतर्गत काम सुरू आहे़ यामुळे दर्शनसाठी अडचणी येऊनही भाविकांचा उत्साह कायम होता़ लवकरच ही कामे पूर्ण होऊन विस्तारीत तिर्थक्षेत्र उजळून निघणार आहे़ मंदिराच्या गाभाऱ्यात स्वयंसेवक, पुजारी यांच्याकडून तर मंदिर परिसरात केदारेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांसाठी विविध सोयी करण्यात आल्या होत्या़

Web Title: Crowds of devotees rush to Kedarshwar temple in light of Makar Sankranti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.