जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांनाच पीकविमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 12:57 PM2020-07-03T12:57:05+5:302020-07-03T12:57:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या वर्षी पिकांचा विमा करणाºया नऊ पैकी केवळ सहा हजार शेतकऱ्यांना विमा परतावा ...

Crop insurance for only six thousand farmers in the district | जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांनाच पीकविमा

जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांनाच पीकविमा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या वर्षी पिकांचा विमा करणाºया नऊ पैकी केवळ सहा हजार शेतकऱ्यांना विमा परतावा शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे़ विम्याची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम सुरू असून पावणेपाच कोटी रुपयांचा परतावा शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे़
जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात अतीवृष्टीमुळे शेतकºयांच्या कोट्यवधी रुपयांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले होते़ या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाकडून पॅकेज जाहिर करण्यात आले होते़ यासोबतच नऊ हजार शेतकºयांनी पिक विमा करुन घेत उत्पादनाला संरक्षण दिले होते़ गेल्या वर्षातील नुकसानीनंतर कृषी विभागाने निश्चित केलेल्या विमा कंपनीकडून दीड हजाराच्यावर पिक कापणी प्रयोग सुरू करण्यात आले होते़ फेब्रुवारी अखेरपर्यंत हे प्रयोग सुरूच होते़ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा झाल्याने पिक विमा करणाºया शेतकºयांच्या परतावा देण्यासाठी होणारे कामकाज थांबले होते़ लॉॅकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर या कामाला विमा कंपनी आणि शासनाकडून वेग देण्यात आला होता़ यांतर्गत जिल्ह्यातील ३६ मंडळातील शेतकºयांना विमा रक्कम मंजूर करण्यात येऊन वितरणाचे कामकाज सुरु झाले आहे़ ही रक्कम राष्ट्रीयकृत, खाजगी आणि जिल्हा बँकेत खाती असलेल्या शेतकºयांना प्राप्त होत असल्याची माहिती देण्यात येत आहे़ अद्याप दोन हजाराच्या जवळपास शेतकºयांना रक्कम प्राप्त झाली असल्याची माहिती आहे़
जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात जुलै अखेरपर्यंतच्या अंतिम मुदतीत २ हजार ६९४ कर्जदार तर ३ हजार ७८४ बिगर कर्जदार शेतकºयांनी पिकविमा करवून घेतला होता़ एकूण सहा हजार ४८२ शेतकºयांनी एक कोटी १९ लाख ८० हजार ३२८ रुपयांचा भरणा केला होता़ यातून सात हजार ४६ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले होते़ दरम्यान राज्य शासनाने तातडीने दोन दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर पुन्हा नव्याने तीन हजार ३१३ शेतकºयांनी पीक विमा करुन घेतला होता़ यामुळे जिल्ह्यात चार हजार ४११ कर्जदार तर पाच हजार ३८५ बिगर कर्जदार शेतकºयांनी खरीप पिकांचा विमा करुन घेतला होता़ एकूण नऊ हजार ७९६ शेतकºयांनी एक कोटी ६७ लाख ३८ हजार ५२० रुपयांची रक्कम विम्यापोटी जमा केली होती़ यातून दहा हजार ३०६ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे़ शासनाने आठ कोटी १२ लाख ५३ हजार रुपये अनुदान देत नियुक्त करण्यात आलेल्या विमा कंपनीकडे ३६ कोटी ८२ लाख रुपयांचा भरणा केला होता़ या प्रक्रियेनंतर गेल्या वर्षभरापासून शेतकºयांना विमा परताव्याची प्रतिक्षा होती़
३६ महसूली मंडळात विविध खरीप पिकांची काढणी केल्यानंतर कृषी विभागाच्या मदतीने विमा कंपन्यांचे प्रतिनिधी व कृषी विभाग यांच्या समन्वयाने १ हजार ८३५ पीक कापणी प्रयोग केले होते़ पिकांच्या उत्पादनाची सात वर्षांची सरासरी आणि गेल्या वर्षाचे नुकसान तपासून विमा परतावा देण्यात आला आहे़

४पिक विमा कंपन्यांकडून ६ हजार ३७३ शेतकºयांना विमा मंजूर करण्यात आला आहे़ यासाठी ४ कोटी ७२ लाख ४५ हजार १७६ रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे़ शेतकºयांना हरभरा, कापूस, भात, सोयाबीन, मूग, भूईमूग, मका, बाजरी, लाल हरभरा, आजवान, ज्वारी या पिकांसाठी विमा मंजूर करण्यात आला आहे़ अतीवृष्टीतील नुकसानीच्या आढाव्यानुसार ही रक्कम मंजूर करण्यत आली आहे़
धडगाव तालुक्यातील खुंटामोडी मंडळात आठ, तोरणमाळ मंडळात ६१, धडगाव ४१४,
नंदुरबार तालुक्यातील आष्टे मंडळात २१०, खोंडामळी मंडळात १ हजार ४१७, नंदुरबार मंडळात ९४७, धानोरा २२, कोरीट ४३, मांडळ २६, रनाळे ४३,
नवापुर तालुक्यात खांडबारा मंडळात ६१, विसरवाडी १४५, नवापुर २६१, चिंचपाडा ७१, नवागाव ६२,
तळोदा मंडळात १,
शहादा तालुक्यातील म्हसावद मंडळात २४३, प्रकाशा मंडळा ९२४, सारंगखेडा ४२२, मोहिदा ४, शहादा १७३, कलसाडी १
अक्कलकुवा मंडळात ९५, मोरंबा २, मोलगी ७, मंडळात वडफळी ३ आदी शेतकºयांना विमा मंजूर करण्यात आला आहे़
नंदुरबार तालुक्यात पावसामुळे पिकांचे अधिक नुकसान झाले असल्याने नंदुरबार, आष्टे व खोंडामळी मंडळात शेतकºयांची संख्या अधिक आहे़ त्यांच्या खात्यावर पैसे टाकले जात आहे़

Web Title: Crop insurance for only six thousand farmers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.