शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:31 IST

खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीत मोठी दरवाढ केली आहे. कोरोना काळात आधीच लॉकडाऊनने बेजार असलेल्या ...

खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीत मोठी दरवाढ केली आहे. कोरोना काळात आधीच लॉकडाऊनने बेजार असलेल्या शेतकऱ्यांना ही दरवाढ दुष्काळात तेरावा महिना ठरणारी आहे. त्यामुळे पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यातच या दरवाढीने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदना यावर्षीही कमी होताना दिसत नाहीत. आधी बोंडअळी, दुष्काळ, अतिवृष्टी, कोरोना, लॉकडाऊन, संचारबंदी आणि आता रासायनिक खतांची दरवाढ केल्याने यावर्षी शेतकर्‍यांचे आर्थिक गणितच कोलमडणार असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी नवनवीन संकटांचा सामना करावा लागत आहे.

मागील दोन-तीन वर्षात अस्मानी व सुलतानी संकटाने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले पाहावयास मिळत आहेत. विशेष म्हणजे लॉकडाऊनमुळे खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतमालाला अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यामुळे हजारो रुपयांचा खर्च करूनही शेतकऱ्यांच्या हाती कवडीही शिल्लक नाही. परिणामी गेल्यावर्षीसारखेच यावर्षी खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकांच्या दारात पीक कर्जासाठी खेटे घालावे लागत आहेत. त्यातच कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीत मागील वर्षाच्या तुलनेत भरमसाट वाढ केली आहे. काही ग्रेडच्या खतांमध्ये ५०० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा एक नवीन संकट उभे राहिले आहे. या काळात खताची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून बहुतांश शेतकरी पावसाळ्यापूर्वीच खतांची खरेदी करतात. मात्र यावेळी शेतकऱ्यांना खत खरेदी करताना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

महागाई गगनाला

पावसाच्या लहरीपणामुळे मागील चार-पाच वर्षांपासून शेतमालाच्या उत्पादनात सातत्याने घट होत असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित दरवर्षीच बिघडत आहे. काही शेतकऱ्यांचे उत्पादन आले, तर मालाला भाव नाही. दुसरीकडे महागाई गगनाला भिडत असताना शेतीउपयोगी वस्तूंची दरवाढ दरवर्षी पाहावयास मिळते. एकंदरीत अतिवृष्टी, पीक कर्जासाठी बँकांच्या दारात रांगा, वाढती महागाई आणि आता खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भरच पडली आहे.

खताची दरवाढ शेतकऱ्यांच्या मुळावर...

शहादा तालुक्यामध्ये चार-पाच वर्षांपासून पावसाचा लहरीपणा आणि यावर्षीपासून तर कोरोनामुळे लॉकडाऊन, संचारबंदी, तसेच बाजार समितीत्याही काही काळ बंद पडल्यामुळे उत्पादित मालाची विक्री करता येत नव्हती. त्यातच भर म्हणून की काय, खतांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर बनला आहे. अजूनही कृषी दुकानदारांची गेल्यावर्षीची उधारी वसूल झालेली नाही. खतांमध्ये झालेली भाववाढ ही शेतकर्‍यांच्या एकप्रकारे मुळावरच आलेली आहे. खतांची भाववाढ कमी करण्यात यावी, अशी मागणी शहादा तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.