शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

दुबार पेरणीचे संकट टळले; शेतकरी सुुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 12:20 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शुक्रवारी सायंकाळपासून पहाटेपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शुक्रवारी सायंकाळपासून पहाटेपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळली आहे. शेतकऱ्यांनी १५ दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर खरीप पिकांची पेरणी केली होती. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतेत होते. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला असून आता १०० टक्के पेरण्या पूर्ण होतील.शहादा तालुकाशहरासह परिसरात शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह दीड-दोन तास मुसळधार पाऊस झाला. शहरातील गल्लीबोळांमध्ये व नवीन वसाहतींमध्ये पाण्याचे तलाव साचले. ग्रामीण भागातही चांगला पाऊस झाला. या पावसामुळे कापूस, सोयाबीन यासह खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. या पावसामुळे शहर व तालुक्यात कुठेही नुकसान झाले नसल्याची माहिती आहे.शुक्रवारी दिवसभर कमालीचा उकाडा होता. रात्री आठ वाजता अचानक विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तीन तास संततधार सुरू होती. पंचायत समितीच्या कार्यालय आवार, कृषी उत्पन्न बाजार समिती आवार, शासकीय विश्रामगृह, भाजी मार्केट परिसरासह नवीन वसाहतींमध्ये पाणी साचले होते. साईबाबा नगरातील तीन ते चार घरांमध्ये पाणी शिरले. डोंगरगाव रस्त्यावरील पाट भरून वाहत होता. शहरातील वीजपुरवठा चार तास खंडित झाला होता. शहादा नगरपालिकेच्या नियोजित ट्रक टर्मिनल जागेवर पाणी साचल्याने तात्पुरते सुरू असलेले भाजीपाला मार्केटमधील विक्रेत्यांना अडचणीचे ठरत आहे. शनिवारी सकाळी किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी प्रेस मारुती मंदिर रस्त्यावर व खरेदी-विक्री संघाजवळ असलेल्या पालिकेच्या मार्केटलगत भाजीपाला विक्री सुरू केली. पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची वसाहत असलेल्या भागात पावसाचे पाणी साचल्याने तेथील नागरिकांना घराच्या बाहेर पडणेही अवघड होत आहे. पाणी साचल्याने दुर्गंधी पसरुन डास-मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तालुक्यातील पाडळदा, वैजाली, म्हसावद, मंदाणे, सारंगखेडा, मोहिदे, जयनगर, कहाटूळ, कौठळ, कुकावल, कोठली, शिरुड, वरूळ कानडी परिसरातही चांगला पाऊस झाला. गोमाई, वाकी, सुसरी व कन्हेरी या नद्या दुथडी भरून वाहायला लागल्या. या पावसामुळे आता १०० टक्के पेरण्या होतील. शनिवारी सकाळी शहादा शहरात शेती उपयोगी वस्तू खरेदीसाठी शेतकºयांनी मोठी गर्दी केली होती. खते व बियाण्यांच्या दुकानांवरही गर्दी झाली होती.शहादा-प्रकाशा मार्गावर करजई, बुपकरी व डामरखेडा गावाजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने अनेक वाहने रस्त्यावर टाकलेल्या मातीचा चिखल झाल्याने वाहनांची चाके घसरली होती. काही ठिकाणी ठेकेदाराने खड्डे न भरल्याने ते दिसत नव्हते, मोटारसायकल स्वार त्यात जाऊन पडत होते. रात्रीच्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने अवजड वाहन चालकांना वाहन बाहेर काढणे अवघड जात होते. लगतच असलेल्या दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. ग्रामस्थांनी स्वत: बॅटरी लावून वाहनांना रस्त्यावर आणण्यासाठी प्रयत्न केले. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांची शेतकºयांनी लागवड केली होती. त्यानंतर पाऊस गायब झाल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकºयांवर आले होते. मात्र शुक्रवारी झालेल्या पावसामुळे हे संकट टळले.कळंबू परिसरात समाधानगेल्या १० ते १२ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले. १२ जून रोजी पावसाने परिसरात हजेरी लावली होती. या पावसावरच शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कापूस व मका पिकाची लागवड केली होती. परंतु त्यानंतर पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकºयांसमोर दुबार पेरणी व लागवडीचे संकट निर्माण झाले होते.मोठा खर्च करून जगविलेले पिके पाऊस वेळेवर न आल्यास वाया जातील की काय ही चिंता शेतकºयांना सतावत होती. शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता कळंबूसह परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले.वैंदाणे परिसरनंदुरबार तालुक्यातील वैंदाणे परिसरात शुक्रवारी संध्याकाळी मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. तासभर झालेल्या या पावसामुळे शेतातील बांध फुटून पाणी बाहेर पडत होते. पावसाने दडी मारल्याने शेतकºयांना पावसाची प्रतीक्षा लागली होती.