अक्कलकुव्यात वीज चोरीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 21:55 IST2020-08-13T21:55:29+5:302020-08-13T21:55:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा येथे वेगवेगळ्या घटनेत तीन जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकुवा ...

Crime of power theft in Akkalkuwa | अक्कलकुव्यात वीज चोरीचा गुन्हा

अक्कलकुव्यात वीज चोरीचा गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा येथे वेगवेगळ्या घटनेत तीन जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्कलकुवा बसस्थानकाजवळ रघु चौधरी यांच्या दुकानात वीज कंपनीने तपासणी केली असता तेथे आकडी टाकून वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आले. एकुण ८,४२४ रुपयांची वीज चोरी झाल्याने इक्बाल शेख अब्दुल पिंजारी, रा.मक्राणीफळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना बसस्थानक परिसरातच रुस्तम शहनवाज मक्राणी यांच्या दुकानात देखील वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता तेथे १५ हजार ६६० रुपयांची वीज चोरी झाल्याचे उघड झाले. तिसरी घटना देखील बसस्थानक जवळीच रघु चौधरी यांच्या दुकानात २० हजार ४३० रुपयांची वीज चोरी झाल्याचे उघड झाले. याबाबत वीज कंपनीचे सहायक अभियंता नरेश कोचर यांनी फिर्यादी दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास हवालदार जोहरी करीत आहे.

Web Title: Crime of power theft in Akkalkuwa