लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मामाचे मोहिदा, ता.शहादा येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी गावातीलच एकाविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दशरथ भगवान कोळी, रा.मामाचे मोहिदा असे संशयीताचे नाव आहे. दशरथ याने गावातीलच १७ वर्ष वयाच्या मुलीला फूस लावून पळवून नेली. त्यांचा ठिकठिकाणी शोध घेतला असता मिळून आले नाही. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी शहादा पोलिसात फिर्याद दाखल केली. दशरथ कोळी विरुद्ध अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक निरिक्षक वाघ करीत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}