शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

कोविड सेंटरमध्ये होऊ लागला शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:30 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील सर्वच कोरोना विलगीकरण कक्षात अर्थात कोरोना केअर सेंटरमध्ये आता शुकशुकाट जाणवू लागला आहे. तब्बल ७२ ...

नंदुरबार : जिल्ह्यातील सर्वच कोरोना विलगीकरण कक्षात अर्थात कोरोना केअर सेंटरमध्ये आता शुकशुकाट जाणवू लागला आहे. तब्बल ७२ टक्के बेड रिकामे आहेत. रेल्वे कोविड सेंटरची तर पांढरा हत्ती पोसण्यासारखी स्थिती झाली आहे. ३७८ बेडसंख्या असलेल्या रेल्वे सेंटरमध्ये केवळ २३ रुग्ण भरती आहेत. तळोदा व धडगावच्या तीन सेंटरमध्ये तर एकही रुग्ण नाही. कोविड सेंटरमध्ये रुग्ण कमी होऊ लागले तरी एकही सेंटर बंद केले जाणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत कोरोना रुग्णांचा एकप्रकारे विस्फोटच झाला होता. शासकीय व खासगी रुग्णालयांत बेड नव्हते, ना कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरणासाठी देखील जागा मिळत नव्हती. त्यामुळे घरी विलगीकरणाची परवानगी देण्यात आली. मात्र, गेल्या तीन आठवड्यांत प्रत्येक तालुक्यात तीनपेक्षा अधिक कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. गावोगावी शाळांमध्येदेखील केअर सेंटर तयार करण्यात आले. त्याचा उपयोग झाल्याने तसेच इतर उपाययोजनांमुळे रुग्ण संख्या मर्यादित झाली. आता तर ३०० च्या आतच दररोज रुग्ण येऊ लागल्याने कोविड केअर सेंटरमध्ये शुकशुकाट दिसू लागला आहे.

१५ केअर सेंटर

जिल्ह्यात १५ ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. त्यात नंदुरबारसह नवापूर व धडगाव तालुक्यात प्रत्येकी तीन, तर शहादा, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात प्रत्येकी दोन ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले.

याशिवाय मोठ्या गावांमध्ये जास्त रुग्ण आढळल्यास प्राथमिक शाळांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले. त्यांची संख्या देखील ५० पेक्षा अधिक होती. त्याचा परिणाम संशयित किंवा कमी लक्षणे असलेले रुग्ण घरी न राहता विलगीकरण कक्षात राहू लागल्याने संसर्ग कमी झाला आणि रुग्ण संख्या आटोक्यात आली.

१६२१ बेड संख्या

१५ कोविड केअर सेंटरमध्ये एकूण १६२१ बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यात नंदुरबार तालुक्यात तीन सेंटरमध्ये ७६८ बेड, शहादा तालुक्यात दोन सेंटरमध्ये ९० बेड, नवापूर तालुक्यात तीन सेंटरमध्ये ३८८ बेड, तळोदा तालुक्यात दोन सेंटरमध्ये १५० बेड, अक्कलकुवा तालुक्यात दोन सेंटरमध्ये ६५, तर धडगाव तालुक्यात तीन सेंटरमध्ये १६० बेडचा समावेश आहे. सर्वाधिक क्षमतेचे सेंटर हे रेल्वे कोविड केअर सेंटर असून तेथे ३७८ बेड आहेत.

कोविड सेंटरमध्येही ऑक्सिजन बेड

जिल्ह्यातील काही कोविड सेंटरमध्ये विशेषत: ग्रामीण रुग्णालयाला जोडून तयार करण्यात आलेल्या केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यात शहादा तालुक्यात ४९, नवापूर तालुक्यात ४०, धडगाव तालुक्यात दोन, अक्कलकुवा तालुक्यात १५, तळोदा तालुक्यात केअर सेंटरमध्ये २० ऑक्सिजन बेड आहेत.

चार ठिकाणी शुकशुकाट

जिल्ह्यातील चार कोविड केअर सेंटरमध्ये तर शुकशुकाट आहे. त्यात धडगाव सीसीसी सेंटर, धडगाव ग्रामीण रुग्णालय सीसीसी सेंटर येथे तर एकही रुग्ण नाही. अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालय सेंटरमध्ये केवळ तीन, तर प्रकाशा सीसीसीमध्ये केवळ पाच रुग्ण आहेत. लवकरच त्यांनाही डिस्चार्ज मिळणार आहे.

नंदुरबारातील केवळ महिलांसाठी असलेल्या तापी कोविड सेंटरची क्षमता १२० बेडची असताना या ठिकाणी केवळ २२ रुग्ण आहेत. मांडवी, ता. धडगाव येथील कोविड सेंटरची मर्यादा १०० बेडची असताना तेथे केवळ १४ रुग्ण आहेत.

रुग्ण संख्या कमी झाली किंवा एकही रुग्ण नसला तरी कुठलेही कोविड केअर सेंटर बंद केले जाणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

रेल्वे कोविड सेंटर : पांढरा हत्ती पोसण्याचा प्रकार

n रेल्वे कोविड सेंटरमध्ये तब्बल ३७८ बेड आहेत. त्यासाठी सहा डॅाक्टर, सहा आरोग्य कर्मचारी व सहा इतर कर्मचारी आहेत. एवढ्या मोठ्या केअर सेंटरच्या देखभालीसाठी मोठा खर्च येत आहे. सद्य:स्थितीत येथे केवळ २३ रुग्ण आहेत. या सेंटरमधील रुग्ण संख्या जास्तीत जास्त ६० पर्यंत गेली होती. केवळ पुरुष रुग्णांनाच या ठिकाणी दाखल केले जात असते. तब्बल ३५५ बेड या ठिकाणी रिक्त असल्याने केवळ दोन कोचमध्येच रुग्ण ठेवले जात आहेत. इतर ११ कोच बंद ठेवले आहेत. आणखी रुग्ण संख्या कमी झाली तर हे कोविड सेंटरदेखील बंद करण्याची वेळ येणार असल्याचे चित्र आहे.