शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदी केंद्राच्या परवानगीस आडकाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 13:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या शासनाच्या महामंडळाकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या शासनाच्या महामंडळाकडे तळोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती दरवर्षी मागणी प्रस्ताव पाठवित असली तरी संबंधीत यंत्रणा केवळ जिनिंग मिल्स् अथवा सुतगिरणीची सबब पुढे करून सातत्याने नाकारत आहे. साहजिकच तालुक्यातील कापूस उत्पादक शेतक:यांना आपला माल कवडीमोल किंमतीत खासगी व्यावसायिकांना विकावा लागत आहे.यंदा तर या व्यावसयिकांनी आद्रतेच्या नावावर अक्षरश: लुबाडणूक करीत असल्याची शेतक:यांची व्यथा आहे. शेतक:यांची ही आर्थिक फसगत लक्षात घेऊन महामंडळाने बाजार समितीच्या खरेदी केंद्राच्या प्रस्तावावर तातडीने उपाय शोधून खरेदी केंद्र सुरू करावे, अशी शेतक:यांची मागणी आहे.तळोदा तालुक्यात सातत्याने पजर्न्यामानामुळे साहजिकच शेतकरी केळी, पपई, उस या पाण्याच्या पिकांऐवजी कापूस व धान पिकाकडे वळला आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन गेल्या तीन ते चार वर्षापासून कापसाच्या क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे. यंदा तर साधारण सात ते आठ हजार क्षेत्रावर कापसाची लागवड झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे कापसाचे चांगले उत्पादन येत असते. ताथापि या कापूस उत्पादक शेतक:यांना चांगला भाव मिळत नसल्याचा आज पावेतोचा अनुभव आहे. अगदी शासनाच्या आधारभूत भावापासून सुद्धा शेतक:यांना वंचित राहावे लागत असल्याचे चित्र आहे. कापसाची बाजारपेठ तालुक्यात नसल्यामुळे समाधानकारक भावापासून उपेक्षित राहावे लागत आहे. कापसाचे वाढते उत्पादन आणि शेतक:यांची होत असलेली कोंडी लक्षात घेऊन येथील बाजार समितीच्या संचालक मंडळाने गेल्या तीन ते चार वर्षापूर्वी कापूस-खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी सातत्याने दरवर्षी प्रस्ताव पाठविण्यात येत आहे.हा प्रस्ताव राज्यशासनाच्या नागपूर व औरंगाबाद येथील कॉटन कार्पोरेशन इंडिया लिमिटेड यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवित आहे. मात्र सहकारी सुतगिरणी अथवा जिनिंग मिल्सची सबब पुढे करून बाजार समितीचा हा प्रस्स्ताव कार्यवाही आधीच नाकारण्यात येत आहे. साहजिकच खरेदी केंद्राचाही प्रश्न आजतागायत रखडला आहे. वास्तुवक तालुक्यात अल्पभूधारक शेतक:यांची संख्या मोठी आहे. त्यातही हे सर्व आदिवासी शेतकरी आहेत. या शेतक:यांचा भर केळी, पपई, ऊस, ऐवजी दुबार पिकांवरच असतो. मुख्यता कापूस व इतर धानपीक घेत असतात. म्हणूनच यंदा कापसाची विक्रमी लागवड करण्यात आली आहे. मात्र कापसाच्या दराबाबत सातत्याने होणा:या घसरणीमुळे त्याची पूर्ण आर्थिक कोंडी झाली आहे. यंदा पाऊस जुलै महिन्याच्या शेवटी आला. तोही थेट ऑक्टोबरच्या अखेर्पयत सुरूच राहिला. त्यामुळे कापसाचा हंगामदेखील लांबला. त्यातच पुन्हा अवकाळीने हजेरी लावली. परिणामी कापसाच्या उत्पादनावर प्रचंड परिणाम होऊन उत्पादनाही घट येणार आहे.शेतक:यांपुढे अशा अडचणी असतांना कापसाच्या दराबाबत खाजगी व्यापा:यांनी अडवणूकीचे धोरण घेत चार हजार 300 रूपये क्विंटलने खरेदी करीत आहेत. कापसात ओलावा असल्याचे कारण पुढे करून शेतक:यांची प्रचंड आर्थिक कोंडी करीत असल्याचा आरोप आहे. ढगाळ वातावरणामुळे आधीच कापसाचे बोंड फुटत नाही. जेमतेम वातावरण निवळल्यानंतर शेतकरी बोंडे फुटण्याची वाट पाहतो. त्यातच चोरीचा आणि मजुरांना पैसे अदा करण्यासाठी व्यापारी देईल त्या दामामध्ये नाईलाजास्तव विकत असतो. कमी माल गोळा होत असल्यामुळे पुरेशा गाडीचा भार व खर्चामुळे बाहेर सुतगिरणी अथवा सरकारी जिनिंग प्रेसलाही घेऊन जावू शकत नसल्याची व्यथा काही शेतक:यांनी बोलून दाखविली आहे.  एकूणच्4तालुक्यातील कापूस उत्पादक शेतक:यांना शासनाच्या हमीभावा पेक्षा अधिक भाव मिळावा यासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कापूस खरेदी केंद्राच्या परवानगीसाठी संबंधीत यंत्रणेकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. पत्र व्यवहाराला संबंधीत कॉटन कार्पोरेशन दाद देत नसल्याने माजी आमदार तथा बाजार समितीचे सभापती उदेसिंग पाडवी यांनी आपल्या संचालक मंडळासह नागपूर कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन संबंधीत अधिका:यांशी चर्चा केली होती. तेव्हाही संबंधीत उपस्थित अधिका:यांनी तालुक्यात जिनिंग मिल अथवा सहकारी सुतगिरणीची सबब पुढे केली होती. असेल तर परवानगी देतो. त्या वेळी संचालक मंडळाने प्रकाशा येथील पर्याय सूचविला होता. तरीही कापसाच्या वाहतुकीचा खर्च, रस्त्यातील संभाव्य दुर्घटना याची जोखीम बाजार समितीवरच ढकलल्यामुये खरेदी केंद्राच्या परवानगीचा हा प्रश्न तसाच रेंगाळत ठेवला आहे. साहजिकच हमीभावाअभावी कापूस उत्पादकांची आर्थिक कोंडी केली जात आहे.ा कापसाच्या उत्पन्नातील घट व कमी दरामुळे शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आला असून, निदान शासनाच्या हमी भावाबाबत खाजगी व्यापा:यांची मनमानीस जिल्हा प्रशासनाने वचक ठेवावा, अशी शेतक:यांची मागणी आहे.