शहाद्यात कोरोना योद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 13:08 IST2021-02-03T13:08:45+5:302021-02-03T13:08:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पंचायत समितीच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेले कर्मचारी  बापू पिरन पाटोळे कोरोना योद्धा यांची  सेवा ...

Corona warrior dies during treatment in martyrdom | शहाद्यात कोरोना योद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

शहाद्यात कोरोना योद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : पंचायत समितीच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेले कर्मचारी  बापू पिरन पाटोळे कोरोना योद्धा यांची  सेवा बजावत असताना तब्बल एक महिना मृत्यूशी झुंज देत नाशिक येथील अशोका हॉस्पिटल येथे ३१ जानेवारी रोजी प्राणज्योत मालवली.
शहादा पंचायत समितीच्या आरोग्य विभागात कार्यरत कर्मचारी बापू पिरन पाटोळे हे मार्च २०२० पासून कोरोना काळात अविरत सेवा बजावत होते. या काळात कुठल्याही प्रकारची रजा न घेता ते कार्यरत होते. परंतु २० डिसेंबर २०२० ला त्यांना अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांनी सातपुडा कोविड हॉस्पिटल शहादा येथे कोविड चाचणी केली असता ते पॉझिटिव्ह आढळून आले. कोविडवर औषधोपचार घेत असताना तब्येत अधिकच खालावत होती म्हणून त्यांना सातपुडा येथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी मल्टीस्पेशालिटी नाशिक येथील कोविड हॉस्पिटल अशोका मेडीकेअर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. ३ जानेवारी २०२१ पासून तेथे औषधोपचार सुरू होता. उपचार घेत असताना २९ जानेवारी रोजी अचानक दीर्घ स्वरूपात श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. परंतु काळाने झडप घातली आणि ३१ जानेवारी रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता कोविड प्रादुर्भावाने मृत्यूशी झुंज देताना अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
बापू पिरन पाटोळे यांच्या सेवापूर्तीला फक्त एक महिना असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. 

Web Title: Corona warrior dies during treatment in martyrdom