शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरणात माध्यमिक शिक्षकांना ठेवले दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:48 IST

नंदुरबार : कोरोना लसीकरण करताना प्रशासनाचे नियोजन पाहून अनेकांना अचंबित होत आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी होते आता दुसऱ्या ...

नंदुरबार : कोरोना लसीकरण करताना प्रशासनाचे नियोजन पाहून अनेकांना अचंबित होत आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी होते आता दुसऱ्या टप्प्यात पोलीस, जिल्हा परिषद व आणि महसूल कर्मचारी आहेत. विशेष म्हणजे तीन महिन्यांपासून शाळांमध्ये शिकविणारे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक यांना वगळून बंद असलेल्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आधी प्राधान्य दिले गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा गेल्या आठवड्यापासून सुरु करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी यांना प्रथम लसीकरण करण्यात आले. त्यांची टक्केवारी ७० ते ८० टक्केच्या दरम्यान राहिली. आता दुसरा टप्पा सुरू झाला असून त्यात पोलीस दलातील कर्मचारी, महसूल विभाग व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी त्या त्या विभागातून कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सातही लसीकरण केंद्रांवर नोंदणी झालेल्यांना लसीकरण केले जात आहे.

वास्तविक पहिल्याच किंवा किमान दुसऱ्या टप्प्यात जिल्हा प्रशासनाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व महाविद्यालयीन प्राध्यापक यांचा समावेश केला पाहिजे होता. कारण नोव्हेंबरपासून नववी ते १२ वीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. महिनाभरापासून पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू झाले आहेत. त्यामुळे या शिक्षकांना दररोज विद्यार्थ्यांशी संपर्क येत असतो. परिणामी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसह प्राध्यापकांनाही प्राधान्य दिले गेले पाहिजे होते. दुसरीकडे प्राथमिक शाळा बंद आहेत. त्या कधी सुरू होतील त्याचे सूतोवाच नाही. असे असतानाही प्राथमिक शिक्षकांना दुसऱ्या टप्प्यात सामील केले गेले आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षकांमध्ये नाराजीची भावना आहे.

लसीकरणासंदर्भात नियोजन करणाऱ्या जिल्हास्तरीय यंत्रणेने इतर विभागांबाबतदेखील अशीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त होत आहे.