शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संशयिताचे नमुने पुण्याला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 21:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : परेदशवारी करुन परत आलेल्या कुटूंबातील एकाला कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे वृत्त मंगळवारी जिल्ह्यात भिती ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : परेदशवारी करुन परत आलेल्या कुटूंबातील एकाला कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे वृत्त मंगळवारी जिल्ह्यात भिती पसरली आह़े संशयित रुग्णाला मंगळवारी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचे थुंकी आणि रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत रवाना करण्यात आले असून त्याचा अहवाल गुरुवारी दुपारी आल्यानंतरच स्थिती स्पष्ट होणार आह़े शहरातील दोन महिला आणि एक पुरुष सौदी अरेबियातून दोन दिवसांपूर्वी परत आले होत़े आल्यावर त्यातील पुरुषाला खोकला आणि सर्दीचा त्रास झाल्याने त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होत़े परंतू डॉक्टरांनी शंका उपस्थित केल्यानंतर तिघांनाच जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले होत़े या तपासणीचे वृत्त जिल्ह्यात तातडीने पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली आह़े तिघांनाही जिल्हा रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ यातील पुरुषाचे नमुने रात्री संकलित करुन तातडीने पुणे येथील नॅशनल व्हायरोलॉजि इन्स्टीटय़ूट या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत़ तेथे नमुने तपासल्यानंतरच सत्यता समोर येणार असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आह़े जिल्ह्यात अफवांचे पीक सुरु असल्याने जिल्हा प्रशासनानेही काळजी म्हणून कोरोनाबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आह़े उपचार घेत असलेल्या तिघांपैकी एकास सर्दी आणि खोकल्याचा तर दोघा महिलांना ताप असल्याची माहिती देण्यात आली आह़े त्यांच्यासाठी तज्ञ डॉक्टर व तज्ञ नर्सेसचा स्टाफ तैनात करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आह़े येत्या 24 तासानंतर सत्यता समोर आल्यानंतर त्यांच्यावर होणा:या उपचारांची दिशा ठरणार असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आह़े ही माहिती आरोग्य विभागाला ऑनलाईन कळवण्यात येणार असल्याने त्याकडे विभागासह सर्वाचेच लक्ष लागून आह़े दरम्यान कोरोनाबाबत आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी खाजगी रुग्णालये तसेच ग्रामीण भागात सूचना केल्या असल्याने परदेशात जाऊन आलेल्या नागरिकांना तपासणी करुन घेण्याच्या सूचित करण्यात येत आह़े तूर्तास तिघांव्यतिरिक्त अद्याप परदेशातून कोणीही आलेले नसल्याचा खुलासा करण्यात आला आह़े कोरोनाची भिती असताना जिल्ह्यात होलिकोत्सव साजरा करण्यात येत आह़े सोमवारपासून काठी ता़ अक्कलकुवा येथे होलिकोत्सवात शेकडोंच्या संख्येने आदिवासी बांधव तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी हजेरी लावली होती़ या पाश्र्वभूमीवर येथे प्रशासनातील अधिका:यांचीही उपस्थिती होती़ यावेळी बरेच जण हे मास्क लावून याठिकाणी वावरत असल्याचे दिसून आल़े जिल्ह्यातील काही प्रशासकीय अधिका:यांनी कोरोनाच्या भितीने याठिकाणी येणे टाळल्याच्या चर्चाही काही अधिका:यांकडून करण्यात येत होत्या़ याउलट लोकप्रतिनिधींनी मात्र होळी उत्सावात मोठय़ा उत्साहात सहभाग घेतल्याचे दिसून आले होत़े होळीनिमित्त होणा:या गर्दीत संसर्ग होऊ नये किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी आरोग्य विभागाकडून सर्वतोपरी दक्षता घेण्यात येत असतानाही अधिका:यांनी हजेरी न लावल्याने नाराजीही व्यक्त करण्यात आली होती़ कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर परराज्यातून येथे येणा:या पर्यटकांची संख्याही नगण्य असल्याचे दिसून आले होत़े जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तिघा संशयितांबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ आऱडी़भोये यांच्यांकडून माहिती घेतली असता, ते म्हणाले की, दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे नमुने पुणे येथे पाठवण्यात आले आहेत़ तेथून रिपोर्ट आल्यानंतरच कोरोना आहे किंवा कसे हे समजणार आह़े तूर्तास तिघांवर दक्षता म्हणून उपचार सुरु आहेत़ दोघी महिला ह्या तापामुळे आजारी पडल्या आहेत तर पुरुषाला सर्दी आणि खोकल्याचा त्रास बळावला आह़े नागरिकांनी अफवांवर विश्वासच ठेवू नये, योग्य उपचार आणि काळजी यातून कोरोना बरा होऊ शकतो़ यात रुग्ण दगावण्याची टक्केवारी नगण्य आह़े जिल्ह्यात वाढत्या अफवांमुळे सर्व 11 ग्रामीण रुग्णालय व तळोदा आणि नवापुर येथील उपजिल्हा रुग्णालय स्तरावरील वैद्यकीय अधिका:यांना सूचना करण्यात आल्या आहेत़ गुरुवारी दुपार्पयत तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दाखल असलेल्या तिघांच्या पुढील उपचारांची दिशा ठरणार आह़े दाखल करण्यात आलेल्या तिघा रुग्णांच्या कक्षात कोणासही प्रवेश देण्यात येत नसल्याचे जिल्हा रुग्णालयाने सांगितले आह़े वॉर्डाच्या बाहेर रुग्णांचे नातलग बसून असल्याचे दिसून आल़े रुग्णालयात कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर दक्षता घेण्याबाबत मात्र उदासिनता दिसून आली आह़े एकमेकांच्या भेटी घेणा:या रुग्ण आणि नातेवाईकांसाठी सॅनेटायङोशन किंवा मास्कची व्यवस्था नसल्याची माहिती देण्यात आली आह़े 4कोविड 19 अर्थात कोरोना व्हायरस डिसीस 2019 असे नाव असलेला हा विषाणू शरीरात गेल्यावर ताप, कोरडा खोकला आणि थकवा येणे, काहींना सर्दी, अंग मोडून येणे, नाक बंद होणे, घसा दुखणे तसेच काही रुग्णांना डायरिया होत असल्याची लक्षणे दिसून येत असल्याने जिल्हा रुग्णालयात हे सर्व किरकोळ आजार बरे करण्यासाठी गोळ्या-औषधींचा साठा करण्यात आला आह़े यानुसारच संशयित रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले आह़े