तळोद्यात सात तर नंदुरबारात दोनजण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 12:02 IST2020-06-18T17:49:48+5:302020-06-19T12:02:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील १० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ यात तळोद्यातील तब्बल ७ जणांचा समावेश आहे. ...

Corona positive in 10 people in Nandurbar district | तळोद्यात सात तर नंदुरबारात दोनजण पॉझिटिव्ह

तळोद्यात सात तर नंदुरबारात दोनजण पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील १० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ यात तळोद्यातील तब्बल ७ जणांचा समावेश आहे. आता तळोद्यातील बाधीतांची संख्या ८ झाली आहे. नंदुरबारात देखील दोनजण बाधीत आढळले. लोणखेड्यातील संख्या आता दोन झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता ७८ पर्यंत पोहचली असून त्यातील ३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
गुरुवारी सायंकाळी स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्यात तळोदा येथील ७, नंदुरबार २ तर शहादा येथील एकाचा समावेश आहे़ तळोदा शहरातील मोठा माळीवाडा भागातील ५४ वर्षीय पुरुष, २२, ४५, २६ आणि ३९ वर्षीय महिला, काकाशेट गल्लीतील ३५ तर शिवराम नगरातील ५१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे़
नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनीतील ६३ वर्षीय पुरुष आणि मणियार मोहल्ला भागातील ४६ वर्षीय महिलेचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच लोणखेडा ता़ शहादा येथील ६४ वर्षीय महिलेसही कोरोनाचा संसर्ग झाला आहे़
एकाच दिवसात १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७८ झाली आहे़ आतापर्यंत कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे़
तळोदा शहरात वृद्धेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटूंबातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता़ त्यानंतर थेट सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे़ दरम्यान आरोग्य विभागाचे पथक तळोदा, लोणखेडा ता़ शहादा आणि नंदुरबार येथे बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेत त्यांना क्वारंटाईन करण्याचे कामकाज करत आहे़
दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचा विषय निर्माण झाला आहे.

Web Title: Corona positive in 10 people in Nandurbar district