शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने व्यापतेय नंदुरबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील व्यवहार सर्वसामान्य झाले असताना दुसरीकडे कोरोनाही डोके वर काढू लागला आहे. जिल्ह्यातील रुग्णांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील व्यवहार सर्वसामान्य झाले असताना दुसरीकडे कोरोनाही डोके वर काढू लागला आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या शतकपार झाली आहे. शिवाय मृतांचा आकडा देखील एकने वाढून तो सहावर पोहचला आहे. सहापैकी तीन जण नंदुरबारातील आहेत. यामुळे मात्र चिंता वाढली आहे. सद्य स्थितीत नंदुरबारात सहा ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्र आहे.जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असताना धडगाव तालुका अद्यापही कोरोनापासून लांब आहे. त्यामुळे त्यातल्या त्यात ही समाधानाची बाब आहे. मृतांचा आकडा मात्र बुधवारी एकने वाढला. नंदुरबारातील सिंधी कॉलनीतील वृद्धाचा उपचार घेताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता सहा झाली आहे.नंदुरबार चारही बाजूंनी व्यापतेयनंदुरबार शहरातील रुग्ण संख्या आतापर्यंत ६० पर्यंत पोहचली आहे. शहरातील चारही बाजुना आढळलेले हे रुग्ण आहेत. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी शहरातील मध्यभागातील वस्तीत रुग्ण सापडला होता. त्यानंतर निझर रोड, प्रकाशा रोड, साक्रीरोड, धुळेरोडसह शहरातील विविध भागात रुग्ण सापडले आहेत. जवळपास सर्वच प्रमुख वस्तींमध्ये रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे भितीचे वातावरण कायम आहे. नंदुरबार शहरातील कोरोनाचा प्रादुर्भावर लवकर आटोक्यात आला नाही तर इतर शहरांप्रमाणे नंदुरबारचीही स्थिती होण्यास वेळ लागणार नाही.सहा भागात प्रतिबंधीत क्षेत्रनंदुरबार शहरात सध्या सहा भागात प्रतिबंधीत क्षेत्र आहे. त्यात मच्छिबाजार, गिरिविहार कॉलनी, सिंधी कॉलनी, सिद्धीविनायक चौक, धर्मशांतीनगरसह इतर भागांचा समावेश आहे. दिवसेंदिवस वाढते रुग्ण आणि वाढते प्रतिबंधीत क्षेत्र यामुळे शहरवासीयांच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय ठरला आहे.शतक केले पारजिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता शंभरी पार झाला आहे. आतापर्यंत १०२ रुग्ण आढळले आहेत. बुधवारी १३ जणांच अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यातील ८० टक्के रुग्ण एकट्या नंदुरबार शहरातील आहेत. त्या खालोखाल शहादा शहरातील असून इतर रुग्ण हे तळोदा व ग्रामिण भागातील इतर गावांमधील आहेत. असे असले तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाण देखील ५० टक्केच्या वर असल्यामुळे त्यातल्या त्यात ही समाधानाची बाब ठरत आहे.

नंदुरबारातील सिंधी कॉलनीत दोन दिवसांपूर्वी आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा बुधवारी उपचार घेतांना जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. ६८ वर्षीय वृद्धाची प्रकृती मंगळवारी रात्री खालावली होती. बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकुण मृतांची संख्या ६ झाली आहे. त्यात ३ जण नंदुरबारातील आहेत. तिन्ही मृत हे वयोवृद्ध अर्थात ६० पेक्षा अधीक वयाचे आहेत. त्यात ७० वर्षीय महिलेचा अहवाल येण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. गेल्या आठवड्यात बागवान गल्लीतील एकाचा तर बुधवारी सिंधी कॉलनीतील वृद्धाचा मृत्यू झाला. याशिवाय शहादा येथील युवक व्यापारी, लोणखेडा आणि हिंगणी येथील प्रत्येकी एकाचा यापूर्वी मृत्यू झाला आहे.

 

 

सिव्हीलमध्ये विशेष दक्षता घेण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

नंदुरबार : जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे वाढणारे प्रमाण पहाता येथे विशेष काळजी घेण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.बुधवारी आलेल्या अहवालांमध्ये जिल्हा रुग्णालयातील ८ कर्मचाºयांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. यापूर्वी देखील ९ कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे कर्मचाºयांमध्ये भितीचे वातावरण आहे. जिल्हा रुग्णालयातील कोरोनाचा अटकाव करण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्या अशा सुचना यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत. असे असतांना बुधवारी पुन्हा ८ कर्मचाºयांना कोरोनाची लागन झाल्याचे निष्पन्न झाले.जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी याबाबत लागलीच सुचना करून हा परिसर नियमित सॅनिटाईज करावा, त्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांनी स्वत: लक्ष घालावे अशा सुचना दिल्या. पॉझिटिव्ह आढळलेले सर्व कर्मचारी हे परिचर श्रेणीतील आहेत. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये भितीचे वातावरण कायम आहे.

तळोद्यात पुन्हा कोरोनाचे ५ रुग्णतळोदा : शहरात कोरोनाचे पुन्हा ५ नवीन रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मोठा माळीवाडा भागात २, खान्देशी गल्लीत २ तर भोईगल्लीत एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे तळोद्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १३ पर्यंत पोहचली आहे. यामुळे तळोद्यात विशेष दक्षता घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.