शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे थंडावला टाळ, वीणा, पखवाजाचा निनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:21 IST

वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन महाशिवरात्रीपासून अनेक गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहाची अनेक वर्षांची परंपरा आहे. परंतु, गतवर्षापासून कोरोना ...

वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन महाशिवरात्रीपासून अनेक गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहाची अनेक वर्षांची परंपरा आहे. परंतु, गतवर्षापासून कोरोना आजाराने थैमान घातल्यामुळे तो आजार रोखण्यासाठी शासनाच्या वतीने धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. एकादशीनिमित्त चालणारे गावोगावी सामूहिक भजन, कीर्तन, प्रवचन तसेच दररोज सायंकाळी गावातील मंदिरांमध्ये सामूहिक हरिपाठ, उपासना चालत असतात. याला टाळ, वीणा, पखवाजाची साथ असते. मात्र, कोरोना संसर्गाच्या भीतीने लागू असलेल्या संचारबंदीमुळे हा निनाद थांबला आहे.

मार्च महिन्यापासून अखंड हरिनाम सप्ताह, यात्रा, मेळावे, उत्सव, मोठ्या प्रमाणात चालू होतात. या काळात अनेक गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहाची संख्या मोठ्या प्रमाणात असते. कीर्तनकार, पखवाजवादक, विणेकरी, चोपदार, टाळकरी, प्रवचनकारही या दिवसांत व्यस्त असतात. परंतु, गतवर्षीपासून कोरोनामुळे संचारबंदी तर कधी लॉकडाऊन चालूच आहे. यामुळे सर्व सामूहिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. लोकांची गर्दी टाळण्यासाठी कीर्तनकार, प्रवचनकार कुठेही जात नाहीत. आषाढ, श्रावण महिन्यांत गावोगावी श्रीमद्भागवत सप्ताह, काकडा आरती, गाथा पारायण, भजन, कीर्तन, प्रवचन तसेच गावात स्‍नेहभोजन आदींसह दिनक्रम चालू असतात. गावोगावी प्रत्येक एकादशीला रात्री संप्रदाय पंथाचे सामूहिक भजन, तर दुसऱ्या दिवशी द्वादशीला स्नेहभोजन, दररोज मंदिरामध्ये सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान सामूहिक हरिपाठ होत असतो.

मंदिर परिसरात आनंदमय व भक्तिमय वातावरण ‍निर्माण होते. पण, कोरोनाच्या भीतीने व चालू असलेल्या संचारबंदीमुळे सर्व धार्मिक, सांस्कृति‍क कार्यक्रम रद्द झाले आहेत. काही ठिकाणी सप्ताहाची परंपरा स्थगित होऊ नये, यासाठी तुकाराम गाथा पारायण, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण एकाच व्यक्तीने मंदिरामध्ये‍ बसून, त्याच ति‍थीवर सुरू असल्याचे दिसून येत आहे.