शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
4
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
5
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
6
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
7
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
8
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
9
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
10
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
11
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
12
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
13
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
14
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
15
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
16
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
17
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
18
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
19
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
20
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा सध्या जिल्ह्यात ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 11:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कातील सर्वच व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. संशयीत रुग्णांच्या अहवालांचा देखील त्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कातील सर्वच व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. संशयीत रुग्णांच्या अहवालांचा देखील त्यात समावेश आहे. दुपारी एकही अहवाल कोरोना तपासणी प्रयोगशाळेत प्रलंबीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सायंकाळी मात्र कर्मचाऱ्यांचे १३ स्वॅब घेण्यात आले. उपचार घेणारे सहा रुग्णांपैकी पाच रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांनाही लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे. नवीन रुग्ण देखील चार दिवसांपासून आढळलेला नसल्याने जिल्हावासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव एप्रिलच्या दुसºया आठवड्यापासून सुरू झाला. पहिला रुग्ण नंदुरबार येथे १८ एप्रिल रोजी आढळून आला होता. त्यानंतर शहादा, अक्कलकुवा, विसरवाडी, ता.नवापूर येथे रुग्ण आढळून आले. याशिवाय नाशिक येथे डिटेक्ट झालेले बामखेडा, ता.शहादा आणि सोमावल, ता.तळोदा येथील दोन रुग्णांचा देखील समावेश आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नोंद असलेले ३७ आणि जिल्हाबाहेर आढळलेले दोन असे एकुण ३९ जण कोरोनाबाधीत होते. त्यांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींची देखील तपासणी करण्यात आली होती.१,३९९ जणांची तपासणीनंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत तीन महिन्यात १,३९९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी ३७ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी २८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ३ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जिल्हा रुग्णालयातील कोवीड कक्षात उपचार घेत आहेत. तर तब्बल १,३५४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.जिल्हा रुग्णालयातील कोवीड कक्षात आतापर्यंत २११ जणांनी उपचार घेतले आहेत. जवळपास ८२५ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. कोवीड कक्ष आणि जिल्हा रुग्णालयातील एकुण ३१४ जणांचा आतापर्यंत स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.सोमवारी उर्वरित सर्व १३ अहवाल प्राप्त झाले. ते सर्व कोरोना निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सहा जण उपचार घेत असून त्यापैकी ५ जणांची प्रकृती चांगली झाली आहे. त्यांचा तिसरा स्वॅब निगेटिव्ह आल्यास त्यांना कोवीड कक्षातून डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.संकट टळलेले नाहीजिल्ह्यात गेल्या चार दिवसात एकही रुग्ण आढळून आलेला नसला आणि सर्वच अहवाल निगेटिव्ह आले असले तरी कोरोनाचे संकट टळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी यापुढेही सतर्क राहणे आवश्यक ठरणार आहे. सध्या अनलॉकडाऊन १ सुरू झाले असल्यामुळे बाजार आणि इतर विविध बाबी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. परिणामी प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक आहे.आरोग्य यंत्रणाही समाधानीकोरोनाचे पाठविलेले सर्व अहवाल निगेटिव्ह येणे, नवीन रुग्ण न आढळणे, नवीन संशयीताचे स्वॅब घेतले न जाणे यामुळे आरोग्य यंत्रणेने देखील आता मोकळा श्वास घेतला आहे. परंतु बाहेरून येणाºया नागरिकांमुळे जिल्ह्यात आजही धोका कायम आहे. ही बाब लक्षात घेता ग्रामपंचायत स्तरावर जिल्हा प्रशासनाला सतर्क ठेवणे आवश्यक ठरणार आहे.कोरोना रुग्णाच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने व नवीन स्वॅब घेतले न गेल्याने दुपारी ३ वाजेपर्यंत अहवालाची वेटींग शून्यावर आली होती.दुपारी मात्र जिल्हा रुग्णालयातील कोवीड कक्ष आणि इतर १३ कर्मचाऱ्यांचे नियमित स्वॅब घेतले गेल्याने स्वॅबची वेटींग ही १३ वर आली आहे. त्यांचा अहवालही लवकरच येणार आहे.