शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
4
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
5
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
6
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
9
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
10
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
11
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
12
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
13
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
14
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
15
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
16
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
17
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
20
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी संपाला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 12:49 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :   सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी लाक्षणीक संप पुकारला होता. काही संघटना प्रत्यक्ष ...

 लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :   सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी लाक्षणीक संप पुकारला होता. काही संघटना प्रत्यक्ष सहभागी झाल्या तर काही संघटनांनी बाहेरून पाठींबा दिला. त्यामुळे शासकीय कामकाज काही प्रमाणात प्रभावीत झाल्याचे चित्र होते. दरम्यान, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा, शेतमजूर युनियन यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले.  
कर्मचाऱ्यांच्या एकदिवशीय संपात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या समन्वय समितीच्या माध्यमातून २० पेक्षा अधीक संघटना सहभागी झाल्या होत्या. मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने बाहेरून पाठींबा दिला होता. सकाळी कार्यालय सुरू होण्याच्या वेळेत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर कर्मचारी संपात सहभागी झाले होते.  
काही कार्यालयात शुकशुकाट
संपामुळे काही कार्यालयात शुकशुकाट होता. कर्मचारीच नसल्यामुळे कामकाज ठप्प झाले होते.  जिल्हाधिकारी कार्यालयात हे चित्र प्रकर्षाने दिसून आले. इतर कार्यालयांमध्ये संमिश्र स्थिती होती. त्यामुळे कामे घेऊन येणारऱ्यांना अनेकांना परत फिरावे लागत होत. विविध संघटनांनी जिल्हाधिकारी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन दिले. 
जिल्हा परिषद सुरळीत
जिल्हा परिषदेत दिवसभर कामकाज सुरळीत होते. सकाळी कर्मचारींनी काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले. दिवसभर सर्व कार्यालयांमध्ये उपस्थिती कायम होती. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनही देण्यात आले. 
या संघटनांचा सहभाग
एक दिवसाच्या लाक्षणीक संपात महसूल कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, जुनी पेन्शन हक्क समिती, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, संस्थाचालक संघटना, मुख्यध्यपक संघटना, खाजगी अनुदानित शाळा मुख्याध्यापक संघटना, प्राथमिक शाळा शिक्षक संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना इत्यादी जिल्ह्यातील सर्व कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत.
तहसीलसमोर निदर्शने
सत्यशोधक ग्रामिण कष्टकरी सभा व शेतमजूर युनियन यांनी तहसील कार्यालयासमोर वेगवेगळे आंदोलने केली. शेतकरी व कामगार विरोधी धोरणांचा निषेध करून कायदे  मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी तहसीलदारांना संघटनांच्या पदाधिकारी यांनी निवेदन देखील दिले.