शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दूरसंचारच्या दुर्लक्षीत सेवेविरुद्ध पुन्हा दोन संघटनांच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुरसंचार विभागाच्या दुर्लक्षामुळे दुर्गम भागात उभारलेल्या  टॉवरद्वारे बीएसएनएलच्या ग्रआहकांना योग्य सेवा मिळत नाही. वारंवार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुरसंचार विभागाच्या दुर्लक्षामुळे दुर्गम भागात उभारलेल्या  टॉवरद्वारे बीएसएनएलच्या ग्रआहकांना योग्य सेवा मिळत नाही. वारंवार कोलमडणा:या सेवेला कंटाळून धडगाव व मोलगी भागातील ग्राहकांनी टॉवरचीच होळी करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत निर्णय घेतला गेला नसतानाच पुन्हा दोन संघटनांमार्फत  पुन्हा तक्रारी करण्यात आल्या आहे.मोलगी परिसरातील ग्राहकांच्या सुविधेसाठी दूरसंचारमार्फत मोलगी, जमाना, सरी व वेली तर धडगाव तालुक्यात खुंटामोडी, सुरवाणी, कात्री, सिसा या ठिकाणी उभारण्यात आलेले टॉवर वारंवार बंद पडतात. या खंडीत सेवेमुळे संपर्काच्या  अडचणी निर्माण झाल्या आहे. तर सद्यस्थितीत शासनामार्फत करण्यात आलेली शासकीय व खाजगी ऑनलाईन कामेही वेळेवर पूर्ण होत नाही. तेथील ऑनलाईन सेवा सर्वस्वी बीएसएनएलवर आधारित आहे. त्यामुळे सर्व ऑनलाईन  कामेही याच नेटकर्ववर आधारित आहे. परंतु अशा खंडीत व अविश्वसनीय सेवेमुळे सर्वसामान्य नागरिकांसह प्रशासनाची ऑनलाईन कामे रखडत आहे. वारंवार खंडीत होणारी सेवा दुरुस्त व्हावी म्हणून वारंवार पाठपुरावा करण्यात आला, परंतु त्याची दुरसंचाने दखलच घेतली नाही. त्यामुळे त्या भागातील टॉवरची होळी करण्याचा इशारा ग्राहकांनी दिला. याबाबत दुरसंचारने कुठलाही निर्णय  घेतला नसतानाच पुहा भिलीस्थान टायगर सेनेमार्फत अक्कलकुवा तहसिलदारांना तर अनुसूचित  जमाती दक्षता परिषदेमार्फत  धडगाव तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनांवर बीटीएसचे रविंद्र पाडवी, सुरेश पाडवी, गोविंद पाडवी, ब्रिजलाल पाडवी, केशव पाडवी यांच्या सह्या आहेत. 

धडगाव तालुक्यात उभारण्यात आलेले टॉवर हे बीएसएनएल कर्मचा:यांच्या निष्काळजीमुळे संपूर्ण तालुक्यात समस्या निर्माण झाल्याचे राष्ट्रीय अनुसूचित जमाती दक्षता परिषदेने निवेदनात नमुद केले आहे. कर्मचा:यांच्या दुर्लक्षामुळेच विद्याथ्र्याची शैक्षणिक कामे व अन्य सर्वच ऑनलाईन कामे रखडत आहे. ही समस्या येत्या पाच दिवसात न सुटल्यास संबंधित कार्यालयांना कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. 4जमाना येथील टॉवर सहा महिन्यांपासून बंदच असल्याने ग्राहकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून टॉवरची होळी करण्याच्या आंदोलनात भिलीस्थान टायगर सेनाही सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.