शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात लसीकरणास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:31 IST

नवापूर मतदारसंघात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्याप्रमाणे तोंडाला मास्क, फिजिकल अंतर ...

नवापूर मतदारसंघात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्याप्रमाणे तोंडाला मास्क, फिजिकल अंतर व वारंवार हात स्वच्छ धुवावे. तसेच कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. घरी स्वतःच उपचार करू नये. कोरोनाची माहिती लपवू नये. नवापुरात लवकरच कोरोना नियंत्रित होईल, असे आवाहन आमदार शिरीष नाईक यांनी केले. या वेळी दुसरा कोरोना डोस घेण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्यासह सहकाऱ्यांनी लस घेतली. दररोज १०० च्या वर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण केले जात असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षिका कीर्तिलता वसावे यांनी दिली.

नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागात विसरवाडी, खांडबारा ग्रामीण रुग्णालय आणि पळसून, उमराण, चिंचपाडा, वावडी, डोगेगाव व धनराट या प्राथमिक आरोग्य केंद्रांत सोमवारपासून कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. आरोग्य सेतू किंवा को-विन ॲपवरून ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षाच्या पुढील व्याधीग्रस्त नागरिक आणि रजिस्ट्रेशन केलेल्यांना लस दिली जात आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद वळवी यांनी दिली.

जिल्ह्यासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, धोकाही वाढला आहे. नंदुरबार जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांचा आलेख वाढत असून, विसरवाडी येथील शाळा १६ ते २० मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनावर प्रतिबंधक उपाय सुरू असून, मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. तर विसरवाडी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनातर्फे व्यापारी बांधवांची बैठक घेऊन गुरुवारी भरणारा आठवडे बाजारही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थ मात्र लसीकरणाची वाट पाहत होते. दरम्यान, आता लसीचे आगमनही ग्रामीण भागात झाले असल्याने जनसामान्यांतून समाधान व्यक्त होत आहे.