शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:21 IST

सर्व उपविभागीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकीत्सक, कार्यकारी अभियंता,जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय ...

सर्व उपविभागीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकीत्सक, कार्यकारी अभियंता,जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर इमारतीची तपासणी करून त्यामध्ये रुग्णांसाठी आवश्यक साहित्य हे कुठल्याही क्षणी वापरता येतील अशा स्थितीत आणून ठेवण्याबाबत कार्यवाही करावी. जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी सामान्य चिकित्सकाकडून नियमित आढावा घेऊन त्यांचेकडे उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची माहिती घ्यावी. त्यापैकी लक्षणे असलेल्या संशयित रुग्णांची माहिती घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी.

जिल्हा आरोग्य अधिकरी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी, तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी खासगी रुग्णालयांना नियमित भेटी द्याव्यात. सौम्य, अतिसौम्य लक्षणे असलेल्या कोविडबाधित किंवा संशयित रुग्णांच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती गृह विलगीकरण, अलगीकरणाची रितसर परवानगी घेऊन त्याबाबतच्या नियमांचे पालन करीत आहे किंवा नाही याची तपासणी करावी. कोविड बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेल्या कमीत कमी २०-३० उच्च धोका संपर्कातील व कमी धोका संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना गृह विलगीकरण किंवा अलगीकरण करावे. बाधित रुग्णांना विषाणूचा संसर्ग कुठून झाला याबाबत ठिकाणाचा, कार्यक्रमाचा शोध घेऊन त्या ठिकाणी उपस्थित व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करावी. सर्व तहसीलदार, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी एखाद्या परिसरात कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास सदरचा परिसरातील व्यक्तींच्या हालचालींवर निर्बंध लागू करण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या धोरणानुसार प्रतिबंधित क्षेत्र तयार करावे. अशा ठिकाणी मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी.

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक आयुक्त, औषध निरीक्षक,औषध प्रशासन विभाग, तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सिटी स्कॅन सेंटर, खासगी रेडिओलॉजी, पॅथोलॉजी लॅब येथे आढळून येणाऱ्या कोविड संशयित रुग्णांचे अहवाल जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठविणे बंधनकारक करण्याबाबत कळवावे व सदर ठिकाणी नियमित भेटी द्याव्यात.