शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
4
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
5
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
6
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
9
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
10
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
11
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
12
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
13
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
14
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
15
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
16
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
17
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
20
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी संस्था घेऊ शकतात ‘सभा’ कायदाच देते ‘मुभा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 13:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे गर्दी होतील असे सार्वजनिक उपक्रम रद्द करण्याचे आदेश शासनाने काढले होते़ यामुळे सर्वच ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनामुळे गर्दी होतील असे सार्वजनिक उपक्रम रद्द करण्याचे आदेश शासनाने काढले होते़ यामुळे सर्वच उपक्रम रद्द झाले आहेत़ यात सहकारी संस्थांच्या वार्षिक सभांचाही समावेश होता़ याबाबत संस्थांनी शासनाकडे विचारणा केल्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे पालन केल्यास सभा घेण्यास मुभा असल्याचे सांगण्यात आले आहे़
मार्च महिन्याचे आॅडिट पूर्ण करण्यात आल्यानंतर बहुतांश सहकारी सहकारी संस्थांच्या कार्यकारिण्या घोषित होण्यास प्रारंभ होतात़ यात प्रामुख्याने सभा घेऊन सर्वानुमते ठराव करण्याची पद्धत आहे़ जिल्ह्यात संस्थांची संख्याही मोठी असल्याने वर्षभर विविध कार्यकारी संस्था, गृहनिर्माण संस्था, बाजार समिती, खरेदी विक्री संघ, खादी ग्रामोद्योग, नोकरदारांच्या सहकारी तत्त्वावरील पतपेढ्या यांच्या सभा होवून कार्यकारिणी गठीत करण्याचे काम सुरू असते़ यंदा मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन होवून लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला होता़ यातून सहकारी संस्थांच्या वार्षिक सभांनाही ब्रेक लागला होता़ याबाबत काही संस्थांनी सहकार आयुक्त यांच्याकडे विचारणा केली होती़ यातून सभा घेण्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले असून आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे पालन करत संस्थांनी सभा घेण्याचे सूचित करण्यात आले आहे़ दरम्यान जिल्ह्यातील नोकरदार सहकारी संस्थांकडून वार्षिक लाभांश रखडवला नसल्याची माहिती देण्यात आली आहे़ या संस्थांच्या संचालक मंडळाने त्यांच्यातील चर्चेनंतर लाभांश वितरणाचे कामकाज केल्याचे सांगण्यात आले आहे़


जिल्ह्यात एकूण ८१२ सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या संस्था आहेत़ यात दोन साखर कारखाने, सूतगिरणी, सहकारी बँक, खरेदी विक्री संघ, नोकरदार पतपेढ्या आदी मोठ्या संस्थांसह ३३५ विविध कार्यकारी संस्थांचा समावेश आहे़ या संस्थांची वार्षिक सभा होणे अपेक्षित असते़ यंदा कोरोनामुळे सभा घ्यावा किंवा नाही अशा संभ्रमात या संस्थांचे संचालक मंडळ होते़ परंतु आता शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करुन सभा घेण्याची परवानगी दिली असल्याने त्यांचे प्रलंबित निर्णय मार्गी लागणार आहेत़


शासनाकडून सहकारी संस्थांना मुदतवाढ देण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत़ ते कधीही वार्षिक सभा घेऊ शकतात़ संचालक मंडळांनी सोशल डिस्टन्सिंग घेऊन या सभांचे कामकाज करणे शासनाला अपेक्षित आहे़ आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसारही सभा झाली पाहिजे़
-अशोक चाळक, जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था, नंदुरबाऱ