शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचा दौरा आश्वासनावरच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST

नंदुरबार : राज्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन भरलेले वाहन सापडल्याच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारवर सातत्याने वार करून मुंबईची ...

नंदुरबार : राज्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन भरलेले वाहन सापडल्याच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारवर सातत्याने वार करून मुंबईची हवा तापवली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अचानक धडगाव व मोलगी दौऱ्यामुळे सर्वांनाच या दौऱ्याबाबतचा प्रश्न पडला होता. दौरा आटोपल्यानंतरही स्थानिक नेते मुख्यमंत्र्यांचा अचानक दौरा कसा ठरला, या प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी तीन तास सातपुड्याच्या दुर्गम भागात घालवूनही सातपुड्याच्या वाट्याला काहीच न मिळाल्याने नागरिकांमध्येदेखील या दौऱ्याची वेगळ्या अर्थाने चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी मोलगी आणि धडगाव येथे आले होते. त्यांनी दोन्ही ठिकाणी ग्रामीण रुग्णालयातील कोरोना लसीकरणाची पाहणी करून तेथील नागरिकांशी संवाद साधला. याबरोबरच रस्त्यातच असलेल्या सुरवाणी, ता. धडगाव येथील वीज केंद्राच्या कामाची पाहणी केली आणि धडगाव ग्रामीण रुग्णालयासमोर असलेल्या रोपवाटिकेची पाहणीही केली. राज्याच्या मुख्य सचिवांबरोबर आरोग्य विभागाचे प्रधान सचिव त्यांच्यासोबत होते. तर कृषिमंत्री व आदिवासी विकासमंत्रीही होते. एवढे महत्त्वाचे खाते असलेले मंत्री, मुख्यमंत्री आणि प्रशासनातील सर्वोच्च पदावरील अधिकारी सातपुड्यासारख्या दुर्गम भागात तीन तास वास्तव्याला असतानाही तेथील कुठल्याही महत्त्वाच्या प्रश्नावर समाधान होईल अशी चर्चा झाली नाही. मुळातच धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. लॉकडाऊनच्या काळात या भागात पोषण आहार वेळेवर न पोहोचविल्याने व त्यात अफरातफर झाल्याचा ठपका चौकशीतून मांडण्यात आला आहे. त्यावर कारवाईबाबतचे आदेश होत असताना सर्व काही आलबेल असल्यासारखी स्थिती प्रशासन भासवीत आहे. दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणा सातत्याने चर्चेचा विषय राहिला आहे. त्यामुळे कुपोषणासारख्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी ठोस निर्णय जाहीर केले नाहीत. सातपुड्यातील स्ट्रॉबेरीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. उपमुख्यमंत्र्यांनी त्याची चवही चाखली. मुख्यमंत्र्यांनाही ती भेट देण्यात आली. पण त्या स्ट्रॉबेरीचा गोडवा वाढविण्याबाबतचा ठोस असा आदेश शासनाने अद्याप काढलेला नाही. मुख्यमंत्र्यांनीही त्यावरील भाष्य टाळले. सातपुड्यातील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तोरणमाळ पर्यटन विकासाचा. सातत्याने तोरणमाळ विकासाची घोषणा आजवर होत आली आहे. या दौऱ्यातही मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत ठोस घोषणा केली नाही. केवळ प्रस्ताव पाठवा, पर्यटन मंत्र्यांसोबत चर्चा करू यापलीकडे त्यांनी काही सांगितले नाही. वास्तविक यापूर्वीच शासनाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी तोरणमाळ विकासाचा ५० कोटींचा आराखडा पाठविला आहे. मात्र त्यानंतरही केवळ प्रस्ताव पाठविण्यापलीकडे त्यांनी काही भाष्य केले नाही.

विकासाच्या दृष्टीने अपेक्षाभंग करणारा मुख्यमंत्र्यांचा हा दौरा राजकीयदृष्ट्याही काही चर्चेत राहील असा झाला नाही. मुळातच मुख्यमंत्र्यांच्या अचानक ठरलेल्या दौऱ्याची माहिती स्थानिक आमदार असलेले व पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांना जशी नव्हती तशी शिवसेनेच्या नेत्यांनाही नव्हती. संभाव्य दौऱ्याची चर्चा सुरू होऊन हेलिपॅडचे काम सुरू झाले तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये याबाबतची चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी धडगावला अगदी नाशिकपासून तर धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील विविध भागातून शिवसेनेचे पदाधिकारी आले होते. मात्र त्यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक मिनिटाचीही वेळ दिली नव्हती. त्यामुळे शिवसैनिकांच्या मनातही मुख्यमंत्री भेटले नसल्याची सल दिसून आली. त्यामुळे सर्वांनाच मुख्यमंत्र्यांचा अचानक दौरा कसा ठरला याबाबतची उत्सुकता शेवटपर्यंत लागून होती. अर्थातच, या सर्व चर्चा असल्या तरी विरोधकांच्या आरोपांचा आपल्यावर कुठलाही परिणाम झाला नाही. त्यातून विचलित न होता मुख्यमंत्री म्हणून आपले काम सुरळीत सुरू आहे हे दाखवण्यात मात्र मुख्यमंत्री यशस्वी ठरले हे मात्र निश्चित.