शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
3
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
4
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
5
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
6
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
7
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
8
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
9
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
10
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
11
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
12
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
13
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
14
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
16
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
17
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
18
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
19
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
20
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरण : शेतकऱ्यांनो गहू, हरभरा या पिकांना जपा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 13:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  रब्बीच्या सरासरी क्षेत्राइतके यंदाही क्षेत्र असले तरी यंदा ढगाळ वातावरण, पाऊस यामुळे पिकांना फटका ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  रब्बीच्या सरासरी क्षेत्राइतके यंदाही क्षेत्र असले तरी यंदा ढगाळ वातावरण, पाऊस यामुळे पिकांना फटका बसणार आहे. यामुळे पिकांची उत्पादकता देखील कमी होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे पिकांवर भूरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी नियोजन करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.                 यंदा हिवाळ्यात अर्थात येत्या काही महिन्यात अधूनमधून ढगाळ वातावरण व पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याचा प्रत्यय डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच आला आहे. सलग तीन दिवस पाऊस झाला तर पाच दिवस ढगाळ वातावरण राहिले. यामुळे पेरणी झालेला गहू, हरभरा, मका, करडई या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यापुढील काळात देखील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. हलका पावसाचाही अंदाज आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी पिकांचे आणि त्यावरील विविध किड, रोग यांचा प्रादुर्भाव यापासून पिकांचे संरक्षण या दृष्टीने नियोजन करावे असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. 

जिल्ह्यात ६२४ हेक्टर...जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र ६२४.६८ हेक्टर इतके आहे. जवळपास सर्वच क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. गेल्या वर्षी ५९०.५२ हेक्टर क्षेत्रात रब्बीचा पीकपेरा होता. यंदा नेहमीप्रमाणे गहू पिकाने सर्वाधीक क्षेत्र व्यापले आहे. त्याखालोखाल हरभरा आहे. 

असे आहे जिल्ह्यातील रबीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)गहू    २११.२३ज्वारी    १६०.३३हरभरा    २०४.०४मका    ३३.८२करडई    १.५७

पाऊस झाल्यास कुठल्या पिकांना बसणार फटकायापुढील काळात पाऊस झाल्यास हरभरा, गहू या पिकांना सर्वाधिक फटका बसणार आहे. याशिवाय पपई, आंबा या फळपिकांवरही परिणाम होणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांचे फारसे नुकसान झाले नाही. परंतु यापुढे पक्व अवस्थेतील पिकांना धोका आहे. 

शेतकऱ्यांनी काय काय काळजी घ्यावीढगाच्छादित वातावरणात भुरी रोगाची वाढ कित्येक पटीने वाढते. रब्बी हंगामात ढगाळ हवामान असल्यास अधिक खबरदारी घ्यावी. मात्र, हलकासा  पाऊस झाल्यास भुरी रोगाचे बीजाणू फुटून मृत होतात. पाऊस संपताच भुरी रोगाच्या डागांमधून बीजाणूंची वाढ वेगाने होते. 

शेतकऱ्यांनी काय काय काळजी घ्यावीढगाच्छादित वातावरणात भुरी रोगाची वाढ कित्येक पटीने वाढते. रब्बी हंगामात ढगाळ हवामान असल्यास अधिक खबरदारी घ्यावी. मात्र, हलकासा  पाऊस झाल्यास भुरी रोगाचे बीजाणू फुटून मृत होतात. पाऊस संपताच भुरी रोगाच्या डागांमधून बीजाणूंची वाढ वेगाने होते.