शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींवर वर्चस्वाचे दावे-प्रतिदावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 13:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी झाली असून निकाल जाहीर होताच सर्वच पक्षांतील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी झाली असून निकाल जाहीर होताच सर्वच पक्षांतील नेत्यांनी ग्रामपंचायतींवर दावा सांगितला आहे. जिल्ह्यात विशेषत: कॅांग्रेस, शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी कॅांग्रेस या चार पक्षात सर्वच ठिकाणी लढती होत्या. या चारही पक्षातील जिल्हा प्रमुखांनी विजयाचे दावे, प्रतीदावे केले असून त्यामुळे राजकारणाला वेगळा रंग आला आहे. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार आपापल्या नेत्यांच्या कार्यालयात जाऊन आनंदोत्सव साजरा करीत होते. 

निम्मेपेक्षा अधीक ग्रा.पं.वर भाजपचे वर्चस्व

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ग्रामीण भागातील जनतेने महाविकास आघाडी सरकारवर नाराजी दर्शविली आहे. या सरकारची निष्क्रीयता, भ्रष्टाचार  व विकास शुन्य कारभाराला जनता कंटाळली आहे. त्याचेच या निकालातून चित्र दिसून येत आहे. त्यामुळे भाजपला चांगले यश मिळाले असून जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या निम्मेपेक्षा अधीक ग्रा.पं.वर भाजपला यश मिळाले आहे.    -विजय चौधरी, भाजप जिल्हाध्यक्ष.

आगामी निवडणुकांसाठी पक्षासाठी शुभसंकेत

गामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यातील निवडणूक लागलेल्या सर्वच ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेने चांगली लढत दिली. नंदुरबार आणि धडगाव तालुक्यात पक्षाला चांगले यश मिळाले असून अक्कलकुवा तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायतही शिवसेनेला मिळाली आहे. आगामी काळात सर्वच ठिकाणी भगवा फडकविण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत.        -डॅा.विक्रांत मोरे,  जिल्हाप्रमुख, शिवसेना.

ग्रामीण मतदार पुन्हा कॅांग्रेसच्या बाजुनेच 

जिल्ह्यातील जनता नेहमी कॅांग्रेसच्या पाठीशी असते हे या निवडणुकीतून पुन्हा सिद्ध झाले आहे. नवापूर आणि धडगाव तालुक्यात कॅांग्रेसचे आमदार असून तेथे पक्षाला मोठे यश मिळाले आहे. याशिवाय इतर ठिकाणीही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पालकमंत्री के.सी.पाडवी यांनी जिल्ह्याला चांगला न्याय दिला त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला यश मिळाले आहे.           -दिलीप नाईक,   कार्याध्यक्ष, कॅांग्रेस.