शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:30 IST

करण चाैफुलीवर पुन्हा वाढले खड्डे नंदुरबार : शेवाळी-नेत्रंग महामार्गावर असलेल्या शहरातील करण चाैफुलीवर पुन्हा खड्डे वाढले आहेत. यामुळे ...

करण चाैफुलीवर पुन्हा वाढले खड्डे

नंदुरबार : शेवाळी-नेत्रंग महामार्गावर असलेल्या शहरातील करण चाैफुलीवर पुन्हा खड्डे वाढले आहेत. यामुळे वाहनधारकांचे अपघात घडण्याचे प्रकार सुरू आहेत. खड्ड्यात पावसाचे पाणी साचून असल्याने चारचाकी व दुचाकी वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असल्याची चर्चा आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

रोझवा येथे रस्ता दुरुस्तीची मागणी

तळोदा : तालुक्यातील सरदार सरोवरबाधितांची वसाहत असलेल्या रोझवा पुनर्वसन येथे रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली आहे. रस्त्यांवर खड्डे पडून ग्रामस्थांना अडचणीचे ठरत आहे. पाऊस सुरू असल्याने हे खड्डे जलमय होऊन अपघात होत आहेत. या पार्श्वभूमीवर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गावातील एकही रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नसल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबत ग्रामंचायत सदस्य भरतसिंग पावरा, बिरसा फायटर्सचे बाखऱ्या पावरा, लालसिंग पावरा, कबीर पावरा, हारसिंग पावरा, कालुसिंग पावरा, चाैधरी पावरा, सुरेश पावरा यांनी तालुका प्रशासनाला निवेदन दिले आहे.

शहरात कागदाला आला भाव

नंदुरबार : पाऊस सुुरू झाल्याने ग्रामीण भागात उपाययोजनांनाही गती आली आहे. यात शहरी भागातून साधनांची खरेदी करण्यावर ग्रामीण जनता अधिक भर देत आहे. गेल्या काही वर्षांत धो-धो कोसळणाऱ्या पावसापासून मातीचे छत किंवा गळक्या पत्र्याच्या छतापासून संरक्षण व्हावे यासाठी प्लॅस्टिक कागद वापरण्याला प्राधान्य दिले जाते. दोन दिवसांपासून प्लॅस्टिक विक्रेत्यांकडे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.