ग्रामीन भागातही नागरिकांनी रात्री संचारबंदी पाळण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST2021-03-13T04:56:15+5:302021-03-13T04:56:15+5:30

शहादा तालुक्यातील सारंगखेडा, वडाळी, तोरखेडा यासारखी मोठी बाजारपेठेची गावामध्ये रोजच्या दैनंदिन व्यवहारासाठी ग्रामीण भागातून बँकेच्या कामानिमित्त शासकीय कार्यालयांमध्ये, ...

Citizens in rural areas are also urged to observe curfew at night | ग्रामीन भागातही नागरिकांनी रात्री संचारबंदी पाळण्याचे आवाहन

ग्रामीन भागातही नागरिकांनी रात्री संचारबंदी पाळण्याचे आवाहन

शहादा तालुक्यातील सारंगखेडा, वडाळी, तोरखेडा यासारखी मोठी बाजारपेठेची गावामध्ये रोजच्या दैनंदिन व्यवहारासाठी ग्रामीण भागातून बँकेच्या कामानिमित्त शासकीय कार्यालयांमध्ये, तसेच रोजच्या बाजारासाठी हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ ग्रामीण भागातून ये-जा करीत असतात. सध्या जिल्ह्यासह शहादा तालुक्यातील ग्रामीण भागातही सातत्याने कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यात सारंगखेडापासून जवळच असलेल्या धुळे जिल्ह्यातील निमगुळ या गावात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्याने परिसरात भीती निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून शहरी भागांमध्ये सायंकाळी ७ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. मात्र, ग्रामीण भागातील व्यावसायिकांनी दुकाने संध्याकाळी ७ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवावे, त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना रोगांचा संसर्ग वाढणार नाही. कोरोना रोगाला पायबंद घालण्यासाठी व्यापारी व व्यावसायिकांनी आपल्या दुकानांमधून व्यवसाय करताना स्वतः व ग्राहकांना तोंडाला मास्क आणि सामाजिक अंतर ठेऊन सॅनिटायझरचा वापर करण्यासाठीच्या सूचना कराव्यात. गाव व परिसरात होणाऱ्या विविध धार्मिक व लग्नसोहळ्यात सहभागी होऊ नये व शासकीय नियमाचे पालन करून व्यवसाय करावा, असे आवाहन सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गावकऱ्यांना केले आहे.

Web Title: Citizens in rural areas are also urged to observe curfew at night